Govinda Affair: बॉलिवूड अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनिता आहुजा यांच्यातील वैवाहिक वाद गेल्या काही महिन्यांपासून चर्चेत आहेत. काही महिन्यांपूर्वी माध्यमांसमोर एकत्र हजेरी लावत, 'आम्हाला कोणीही वेगळं करू शकत नाही,' असा दावा करणाऱ्या सुनिता आहुजा यांनी आता गोविंदाच्या कथित अफेअरबद्दल पुन्हा एकदा मोठा खुलासा केला आहे. एका ताज्या मुलाखतीत सुनिता यांनी 'मीदेखील गोविंदाच्या अफेअरबद्दल ऐकलं आहे, पण मी 'रेड-हँडेड' पकडेपर्यंत यावर विश्वास ठेवणार नाही,' असं स्पष्ट केलं आहे.
सुनिता आहुजा यांचा गौप्यस्फोट
अभिनेता पारस एस छाबरा यांच्या 'Abrraa Kaa Dabraa Show' या पॉडकास्टमध्ये सुनिता आहुजा यांना गोविंदाच्या कथित अफेअरबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. यावर उत्तर देताना त्या म्हणाल्या, "मी हे अनेकवेळा माध्यमांना सांगितलं आहे की मीदेखील याबद्दल ऐकलं आहे. पण, जोपर्यंत मी माझ्या डोळ्यांनी बघत नाही किंवा त्याला रंगेहाथ पकडत नाही, तोपर्यंत मी काहीही जाहीर करू शकत नाही. मी ऐकलं आहे की ती एक मराठी अभिनेत्री आहे."
यापुढे बोलताना सुनिता म्हणाल्या, "आता हे सगळं करण्याचं त्यांचं (गोविंदा) वय नाही. गोविंदाने आता आपल्या मुलगी टीनाचं घर आणि मुलगा यशच्या करिअरबद्दल विचार करायला हवा." त्या पुढे म्हणाल्या, "मीदेखील अफवा ऐकल्या आहेत, आणि मी नेहमी सांगितलं आहे की जोपर्यंत मी स्वत:हून तोंड उघडत नाही, तोपर्यंत कशावरही विश्वास ठेवू नका. मी मीडियालाही हेच सांगितलं आहे की, मी नेहमी सत्यच सांगणार, कारण मी खोटं बोलत नाही."
( नक्की वाचा : Satara Doctor Suicide Case : 'महिला डॉक्टरचे दोघांशीही संबंध, चॅट समोर आले ते...' मंत्र्यांच्या आरोपानं खळबळ )
 
महिलांना दिला सल्ला
याच मुलाखतीत सुनिता आहुजा यांनी महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र राहण्याचा आणि पतीच्या कमाईवर अवलंबून न राहण्याचा सल्ला दिला. त्यांच्या युट्यूब चॅनलबद्दल बोलताना सुनिता म्हणाल्या, "तो खूप छान चालत आहे. व्लॉगिंग सुरू केल्यानंतर 4 महिन्यांतच मला युट्यूबचा सिल्व्हर बटन मिळाले. महिलेने स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं. स्वतः पैसे कमावण्यात एक वेगळाच आनंद मिळतो. पती पैसे देतो, पण 10 वेळा विचारल्यानंतर तो एकदा देईल. तुमची स्वतःची कमाई तुमची स्वतःची असते."
'मला 5 BHK घर घेऊन द्या, नाहीतर बघा काय होतं!'
गोविंदा त्यांच्यासोबत राहत नसल्याचंही सुनिता यांनी यावेळी स्पष्ट केलं. त्या म्हणाल्या की, त्या मुलगी टीना आणि मुलगा यश यांच्यासोबत एका 4-बेडरूमच्या घरात राहतात. "हे घर आमच्यासाठी छोटं आहे. या पॉडकास्टच्या माध्यमातून मला 'चिची (गोविंदा), मला एक मोठं 5 BHK घर घेऊन दे, नाहीतर बघ तुझ्यासोबत काय होतं!' असं सांगायचं आहे," असा मजेशीर इशाराही त्यांनी दिला.
( नक्की वाचा : Viral News: भाच्याच्या लग्नात मामांनी दिली 2 कोटींचा मायरा, 1.1 कोटी कॅश , 31 तोळं सोनं, वाचा काय आहे पद्धत? )
 
गोविंदा-सुनिताचं नातं पुन्हा चर्चेत
गोविंदा आणि सुनिता यांच्या घटस्फोटाच्या अफवा फेब्रुवारी महिन्यापासून ऑनलाइन पसरत आहेत. सुनिता आहुजा यांनी काही महिन्यांपूर्वी दिलेल्या वैयक्तिक मुलाखतींमध्ये खासगी गोष्टी सांगितल्यानंतर त्यांच्या नात्यातील अडचणींबद्दलच्या चर्चांना जोर आला होता.
या अफवांदरम्यान, ETimes च्या एका रिपोर्टमध्ये सूत्रांच्या हवाल्याने असं म्हटलं होतं की, "सुनिता यांनी काही महिन्यांपूर्वी कायदेशीर वेगळे होण्याची नोटीस पाठवली होती, पण त्यानंतर काही हालचाल झालेली नाही."
मात्र, त्यानंतर काही महिन्यांपूर्वी हे जोडपं पुन्हा एकत्र आल्याचंही वृत्त होतं. गणेश चतुर्थीच्या वेळी या दोघांनी माध्यमांसमोर एकत्र पोज दिली होती. तेव्हा सुनिता म्हणाल्या होत्या, "आज इतके जवळ-जवळ आहोत... काही झालं असतं तर आम्ही इतके जवळ असतो का? आमच्यात अंतर राहिलं असतं! कोणीही आम्हाला वेगळं करू शकत नाही, वरून देव किंवा सैतान आला तरी."
गोविंदा आणि सुनिता आहुजा यांचा विवाह मार्च 1987 मध्ये झाला होता. 1988 मध्ये त्यांची मुलगी टीना हिचा जन्म होईपर्यंत त्यांनी लग्न गुप्त ठेवलं होतं. त्यानंतर 1997 मध्ये त्यांच्या घरी मुलगा यशवर्धन याचा जन्म झाला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world