जाहिरात

Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांची तब्येत बिघडली; मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल

Dharmendra Health Update: ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेता धर्मेंद्रची तब्येत अचानक बिघडली आहे.

Dharmendra Health Update: धर्मेंद्र यांची तब्येत बिघडली; मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल
Dharmendra Health Update: अभिनेते धर्मेंद्र यांना श्वास घेण्याचा त्रास होत आहे.
मुंबई:

Dharmendra Health Update: ज्येष्ठ आणि लोकप्रिय अभिनेता धर्मेंद्रची तब्येत अचानक बिघडली आहे. 89 वर्षांच्या या अभिनेत्याला श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्याला मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात (Breach Candy Hospital) दाखल करण्यात आलं आहे. कुटुंबातील जवळच्या व्यक्तींनी 'एनडीटीव्ही'  ला ही माहिती दिली आहे.

धर्मेंद्र यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने  एका आठवड्यापेक्षा अधिक काळ रुग्णालयात ठेवले आहे. यावर्षी एप्रिलमध्ये त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं होतं. 8 डिसेंबर 2025 रोजी धर्मेंद्र वयाची 90 वर्ष पूर्ण करतील.

धर्मेंद्रची फिल्मी कारकीर्द

धर्मेंद्रनं 1960 मध्ये 'दिल भी तेरा हम भी तेरे' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सुरुवातीच्या काळात 'अनपढ़', 'बंदिनी', 'अनुपमा' आणि 'आया सावन झूम के' यांसारख्या चित्रपटांमध्ये त्यानं एका सामान्य माणसाची भूमिका केली आणि त्याची प्रतिमा एका गंभीर अभिनेत्याची झाली होती.

नंतरच्या काळात धर्मेंद्रनं ॲक्शन (Action) आणि कॉमेडी (Comedy) चित्रपटांमध्ये आपला ठसा उमटवला आणि तो एक मोठा स्टार बनला. 'शोले', 'धरम वीर', 'चुपके चुपके', 'मेरा गांव मेरा देश' आणि 'ड्रीम गर्ल' यांसारख्या सुपरहिट चित्रपटांमध्ये त्याने मुख्य भूमिका साकारल्या.

( नक्की वाचा : Katrina Kaif: 42 व्या वर्षी कतरिना झाली आई; 'दादा' झालेल्या सासऱ्याची पहिली भावनिक प्रतिक्रिया, म्हणाले.. )
 

धर्मेंद्र नुकतेच शाहिद कपूर आणि कृति सेननच्या 'तेरी बातों में ऐसा उलझा जिया' या चित्रपटात दिसले होते. त्यांचा पुढचा चित्रपट 'इक्कीस' आहे, ज्यात अमिताभ बच्चनचा नातू अगस्त्य नंदा मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट 25 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे.

जुन्या - नवी पिढीसोबत काम

धर्मेंद्र यांनी त्याच्या दीर्घ कारकिर्दीत बलराज साहनी, राज कपूर, संजीव कुमार, अमिताभ बच्चन आणि अमरीश पुरी यांसारख्या दिग्गज कलाकारांसोबत काम केलं. विशेष म्हणजे, ते आजही रणवीर सिंह, शाहिद कपूर, आलिया भट्ट आणि इतर नवीन पिढीतील कलाकारांसोबतही चित्रपटांमध्ये काम केलं आहे.

धर्मेंद्र लवकर बरे व्हावे यासाठी त्याचे फॅन्स आणि संपूर्ण बॉलिवूड सिनेसृष्टी प्रार्थना करत आहे.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com