आई-बाबांपासून लपवलं, शेवटी सर्जरी झाल्यानंतर...; राजश्री देशपांडेला ब्रेस्ट कॅन्सर, चाहते भावुक

सेक्रेड गेम्सची अभिनेत्री राजश्री देशपांडे हिला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक मोठे पोस्ट करीत याबाबत माहिती दिली.

जाहिरात
Read Time: 2 mins

Rajshree Deshpande Breast Cancer : सेक्रेड गेम्सची अभिनेत्री राजश्री देशपांडे हिला ब्रेस्ट कॅन्सर झाल्याचं समोर आलं आहे. अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक मोठे पोस्ट करीत याबाबत माहिती दिली. विशेष म्हणजे आई-बाबांना त्रास होईल या भीतीने राजश्रीने शस्त्रक्रिया होईपर्यंत त्यांना आपल्या आजाराबद्दल काहीच सांगितलं नाही. राजश्रीने थेट इन्स्टाग्रामवर पोस्ट करुन याबाबत माहिती दिली. यामध्ये अभिनेत्रीने सांगितलं की, तिला infiltrating ductal carcinoma (NOS) चं निदान झालं आहे. म्हणजेच अभिनेत्रीला ग्रेड १ चा ब्रेस्ट कॅन्सर झाला आहे. चांगली बाब म्हणजे राजश्री देशपांडे हिच्यावर शस्त्रक्रिया पार पडली असून ती यातून बरी होत आहे. 

राजश्री देशपांडेला ग्रेड १ चा ब्रेस्ट कॅन्सर, इन्स्टाग्रामवर एक सविस्तर पोस्ट...

राजश्री देशपांडेने इन्स्टाग्रामवर लिहिलंय, तुम्ही जेव्हा हे वाचत असाल तोपर्यंत मी माझ्या पालकांना हे सत्य सांगण्यासाठी हिम्मत एकत्र केलीये की मला ब्रेस्ट कॅन्सर आहे. नियमित वैद्यकीय तपासणीदरम्यान हे लक्षात आलं हे चांगलं झालं. त्यामुळे लवकर उपचार सुरू करता आले. 

नक्की वाचा - Urvashi Rautela: केकच्या किमतीत मुंबईत येतील 5 आलिशान घरं; अभिनेत्रीने वाढदिवशी कापला जगातील सर्वात महागडा केक
 

आई-बाबांना पाहून सर्व भीती दूर गेली...

राजश्रीने पुढे लिहिलंय, तुम्हा सर्वांच्या प्रेमाने मला या कठीण परिस्थितीतून बाहेर काढलं. आणि सर्जरीनंतर आई आणि वडिलांचा चेहरा पाहून माझी भीती दूर झाली. ताकद अधिक वाढली. तुम्हा सर्वांच्या सहकार्याने मी जगाचा सामना करण्यासाठी तयार आहे. आता मी ठीक आहे आणि लवकरच रुग्णालयातून घरी जाईन. डॉ. मंदार नाडकर्णी यांचे खूप धन्यवाद. 

Advertisement

राजश्री देशपांडेचं करिअर...

राजश्रीच्या करिअरबद्दल सांगायचं झालं तर २०२५ मध्ये मणिरत्नम यांचा 'ठग लाइफ' या चित्रपटात तिने काम केलं होतं. याशिवाय 'मॉम', 'सेक्रेड गेम्स', 'द स्काय इज पिंक' आणि 'जोरम' मध्येही तिने चांगली भूमिका वठवली आहे. २०१५ मधील 'अँग्री इंडियन गॉडेस'मधून राजश्रीला ओळख मिळाली. २०२३ मध्ये, तिने 'ट्रायल बाय फायर' या मालिकेसाठी 'ड्रामा मालिकेतील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री' साठी फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार जिंकला.

Advertisement