जाहिरात
This Article is From Feb 26, 2026

Urvashi Rautela: केकच्या किमतीत मुंबईत येतील 5 आलिशान घरं; अभिनेत्रीने वाढदिवशी कापला जगातील सर्वात महागडा केक

या केकची किंमत पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. 

Urvashi Rautela: केकच्या किमतीत मुंबईत येतील 5 आलिशान घरं; अभिनेत्रीने वाढदिवशी कापला जगातील सर्वात महागडा केक

Urvashi Rautela Birthday cake worth Rs 16 crore : उर्वशी रौतेलाने २५ फेब्रुवारी रोजी ३२ वा जन्मदिवस साजरा केला. यावेळी उर्वशीपेक्षा तिच्या वाढदिवसानिमित्ताने आणलेला केक चर्चेचा विषय ठरला आहे. उर्वशीचा वाढदिवसाचा केक इतका महाग होता की त्या किमतीत मुंबईत किमान ५ आलिशान घरं विकत घेता येतील. उर्वशी रौतेलाने आपला वाढदिवस भव्यपणे साजरा केला. तिने जगातील सर्वात महागडा ७ टियर केक कापल्याचं सांगितलं जात आहे. या केकवर हिरे लावलेले होते. ज्याची किंमत पाहून तुमच्या पायाखालची जमीन सरकेल. 

जगातील सर्वात महागडा ७ टियर केक...

उर्वशीने वाढदिवसाचा व्हिडिओ शेअर केला असून यामध्ये ती जगातील सर्वात महागडा केक कापताना दिसत आहे. या संपूर्ण केकवर हिरे जडलेले आहेत. या व्हिडिओमध्ये दिसत आहे की, केक पाहून उर्वशीला धक्काच बसला. या व्हिडिओमध्ये दिसतंय की, ती कॅमेऱ्याला जवळ बोलावते आणि केकवरील हिरे दाखवते. आता चाहत्यांनी या व्हिडिओवर कमेंट करीत तिला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. काही चाहत्यांनी विचारलं, हे खरे हिरे आहेत हे कसं कळेल? 

नक्की वाचा - Prajakta Gaikwad : 'बनवा-बनवीचा सचिन पिळगावकर दिसतेस'; लग्नानंतर प्राजक्ताचा लुक ट्रोल, चाहते नको नको ते बोलले

इन्टाग्राम फोर्ब्स रिच लिस्टमध्ये नाव...

गेल्या वर्षी उर्वशी १२ कोटींची रोल्स रॉयस कलिनन खरेदी करणारी पहिली अभिनेत्री ठरली. तिने इन्स्टाग्राम फोर्ब्स रिच लिस्टमध्येही जागा मिळवली आहे. आणि तिच्या नवीन इंस्टाग्राम पोस्टनुसार, अभिनेत्रीने तिच्या कलेक्शनमध्ये आणखी एक आलिशान गाडी जोडली आहे - ५ कोटी रुपये किमतीची ग्रीन जी-वॅगन.

  

संपूर्ण बातमी वाचा
Listen to the latest songs, only on JioSaavn.com