जाहिरात

साई पल्लवीनं केला 'शीला की जवानी' वर डान्स, फॅन्स म्हणाले, 'ही तर कतरिनापेक्षा भारी'

 Sai Pallavi dance video : साई पल्लवीच्या रामायण या सिमेमाची तिचे फॅन्स आतुरतेनं वाट पाहात आहेत. त्याचवेळी तिच्या कॉलेजच्या काळातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालाय

साई पल्लवीनं केला 'शीला की जवानी' वर डान्स, फॅन्स म्हणाले, 'ही तर कतरिनापेक्षा भारी'
मुंबई:

 Sai Pallavi dance video : अभिनेत्री साई पल्लवीच्या रामायण या सिमेमाची तिचे फॅन्स आतुरतेनं वाट पाहात आहेत. त्याचवेळी तिच्या कॉलेजच्या काळातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झालाय. या व्हिडिओत ती 2010 साली आलेला सिनेमा तीस मार खां' मधील 'शीला की जवानी' या सुपरहिट गाण्यावर डान्स केला आहे. कतरिना कैफवर हे गाणं चित्रपटात चित्रित झालंय. व्हायरल व्हिडिओमध्ये साई पल्लवीनं जोरदार डान्स केलाय. 

साई पल्लवीचा डान्स व्हायरल होण्याची ही पहिली वेळ नाही. जानेवारी महिन्यात तिची बहीण पूजा कन्ननचा साखरपुडा झाला होता. त्या साखरपुड्यात शिलानं क्रीम आणि पिवळ्या रंगाची साडी घातली होती. त्यावेळी देखील साईनं जोरदार डान्स केला होता. तो डान्स देखील तिच्या फॅन्सना कमालीचा आवडला होता. 

काही दिवसांपूर्वी साईचा आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामध्ये साईनं राजकुमार पेरियासामीबरोबर लग्न केलं असा दावा करण्यात येत होता. हा व्हिडीओ अनेक सोशल मीडिया पेजवर तसंच फॅन्स क्लबमध्ये शेअर करण्यात आला होता. इंटरनेटवर व्हिडिओ व्हायरल झाल्यानं अनेकांनी साईचं अभिनंदन केलं. अखेर साईनं X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट देत 'माझं लग्न झालेलं नाही,' असं स्पष्टीकरण दिलं. तो व्हायरल व्हिडिओ तिच्या SK21 या चित्रपटातील पूजेचा आहे, असं साईनं सांगितल्यावर फॅन्सचा जीव भांड्यात पडला. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Previous Article
अमिताभ बच्चन यांच्या 'या' सिनेमात रतन टाटांनी गुंतवले पैसे, पण...
साई पल्लवीनं केला 'शीला की जवानी' वर डान्स, फॅन्स म्हणाले, 'ही तर कतरिनापेक्षा भारी'
riteish deshmukh ndtv marathi promo launched and special interview in marathi
Next Article
सुपरस्टार रितेश देशमुख म्हणाला - NDTV मराठी लय भारी