Katrina Kaif Vicky Kaushal Son: बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ आणि अभिनेता विकी कौशल यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन झालंय. कतरिना कैफने मुलाला जन्म दिलाय. या जोडप्याने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत चाहत्यांना गुड न्यूज दिलीय. या पोस्टवर चाहत्यांसह सेलिब्रिटींनीही त्यांचे अभिनंदन करत शुभेच्छांचा वर्षाव केलाय. दिग्दर्शक गुनीत मोंगाने लिहिलंय की, खूप खूश शुभेच्छा. एका युजरने लिहिलंय की, "अभिनंदन! छावा आला"
विकी कौशल आणि कतरिना कैफने डिसेंबर 2021मध्ये धुमधडाक्यात लग्न केले होते. त्यांच्या ग्रँड विवाहसोहळ्यामध्ये नातेवाईक आणि खास मित्रपरिवार सहभागी झाले होते. राजस्थान राज्यातील सिक्स सेंसेस फोर्ट बरवारा येथे जोडप्याने पारंपरिक पद्धतीने लग्न केले. 23 सप्टेंबर 2025 रोजी जोडप्याने प्रेग्नेंसीची बातमी सोशल मीडियावर शेअर केली होती.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world