Saif Ali Khan Attack: सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या हल्लेखोराचं आणखी एक CCTV फुटेज समोर

Saif Ali Khan attacked Update : आणखी एका व्हिडीओत व्हिडिओमध्ये हल्लेखोर दादरमधील एका दुकानातून हेडफोन खरेदी करताना दिसत आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
टहला, हेडफोन खरीदा और फिर कहीं हो गया गुम...

सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्या आरोपीचे आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. हल्ल्याच्या 5 तासांनंतरचं हे सीसीटीव्ही फुटेज आहे. या व्हिडीओमध्ये आरोपी हा हल्ल्या वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर निळ्या शर्टमध्ये दिसत आहे. नवीन व्हिडिओ सुमारे 7 वाजल्याचा असल्याचे सांगण्यात येत आहे. 

आणखी एका व्हिडीओत व्हिडिओमध्ये हल्लेखोर दादरमधील एका दुकानातून हेडफोन खरेदी करताना दिसत आहे. मुंबई पोलिसांची अनेक पथके हल्लेखोराच्या शोधात रात्रंदिवस काम करत आहेत. संपूर्ण मुंबईतील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. मात्र आरोपी सातत्याने पोलिसांना गुंगारा देत आहे.

(नक्की वाचा-  Saif Ali khan:'कुर्ता रक्ताने माखलेला, सोबत छोटा मुलगा', सैफ ज्या रिक्षात बसला त्या रिक्षाचालकानं सर्व थरार सांगितला)

सैफ अली खानवर हल्ला करणाऱ्याला लवकरच पकडले जाईल, असे मुंबई पोलिसांचे म्हणणे आहे. आतापर्यंत समोर आलेल्या व्हिडिओंमध्ये हल्लेखोर बिनधास्त फिरताना दिसत आहे. मात्र आरोपी आपली ओळख लपवण्यासाठी कपडे बदलताना दिसत आहे. 

(नक्की वाचा - Saif Attacked: हल्ल्यामागे सैफच्याच घरातील व्यक्ती? 8 प्रश्न जे मुंबई पोलिसांना करतायत हैराण)

आरोपी गेला कुठे?

सैफवर हल्ला करणारा आरोपी वांद्रे रेल्वे स्थानकातून लोकल किंवा एक्स्प्रेस गाडी पकडून मुंबईच्या आसपास किंवा बाहेरील ठिकाणी गेल्याचा संशय मुंबई पोलिसांना आहे. पोलिसांची अनेक पथके लोकल आणि एक्स्प्रेस रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चोर हा सराईत दिसत नाही.

Advertisement

आजपर्यंत पोलिसांना त्या चोराचा कोणताही गुन्हेगारी रेकॉर्ड सापडलेला नाही. तसेच त्याच्या कुटुंबीयांची किंवा मित्राचीही माहिती पोलिसांना मिळालेली नाही. दोन दिवस उलटूनही हल्लेखोर पोलिसांच्या हाती लागलेला नाही. तो सतत वेश बदलून पोलिसांना चकवा देत आहे. मुंबई पोलिस आणि गुन्हे शाखेची 35 पथके आरोपीच्या शोधात आहेत.