
90 च्या दशकातील लोकप्रिय अभिनेत्री करिश्मा कपूर सध्या पुन्हा चर्चेत आहे. तिला घटस्फोट दिलेल्या उद्योगपती संजय कपूर (Sunjay Kapur Death) याचे निधन झाले आहे. संजय कपूरच्या अंत्यसंस्काराला करिश्मानेही हजेरी लावली होती. करिश्मा आणि संजय यांचा संसार 13 वर्ष टिकला. 2016 साली हे दोघे वेगळे झाले होते. वेगळे होत असताना करिश्माने संजय कपूर याच्यावर अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक आरोप केले होते. करिश्मापासून घटस्फोट घेतल्यानंतर संजयने तिसऱ्यांदा लग्न केले होते. मात्र करिश्माने या कटू आठवणींनंतर लग्न न करण्याचा निर्णय घेतला होता.
(नक्की वाचा: तोंडात मधमाशी गेल्याने कसा झाला मृत्यू? अशा प्रसंगी स्वत:चा बचाव कसा कराल?)
अभिषेक बच्चनसोबत प्रेमसंबंधांची चर्चा, संजय कपूरसोबत लग्न
करिश्माने 90 च्या दशकात बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आणि गोविंदा तसेच सलमान खानसोबत अनेक सुपरहिट चित्रपट दिले. 2003 मध्ये, तिने उद्योगपती संजय कपूरसोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. संजय कपूरसोबत लग्न करण्यापूर्वी तिचे आणि अभिषेक बच्चन यांच्यात प्रेमसंबंध असल्याची जोरदार चर्चा होती, मात्र करिश्माने संजय कपूर याच्यासोबत लग्न करत असल्याचे जाहीर केले तेव्हा अनेकांना आश्चर्य वाटलं होतं. मात्र करिश्माला एक बॉलीवूड अभिनेता प्रचंड आवडत होता, ज्याबद्दल फार लोकांना कल्पना नाहीये.
(नक्की वाचा: दारू पिऊन मॉडेल झिंगली,भलत्याच पार्टीत घुसली; अभिनेत्याच्या घरचे म्हणाले 'सून असावी तर अशी')
करिश्मा कपूर कोणावर भाळली होती ?
कॉमेडी किंग कपिल शर्माच्या शोमध्ये कपूर सिस्टर्स, म्हणजेच करिश्मा आणि करीना सहभागी झाल्या होत्या. तेव्हा कपिलने करीनाला विचारले की, तिची बहीण करिश्माचा कोणत्या अभिनेत्यावर क्रश होता? यावेळी करिश्माच्या कानावर हेडफोन लावण्यात आले होते आणि करीना कपूरने कोणताही संकोच न करता सलमान खानचे नाव घेतले.तिने सांगितले की करिश्माला सलमान खान आवडत होता. (What is the relationship between Karisma Kapoor and Salman Khan?) असं मानलं जातं की अभिषेक बच्चनसोबतच्या कथित प्रेमसंबंधांनंतर आणि संजय कपूर याच्यासोबत लग्न झाल्यानंतरही करिश्माला सलमान खान आवडत होता. (Are Karisma Kapoor and Salman Khan still friends? )करिश्मा आणि सलमानने 'बीवी नंबर १', 'जुडवा', 'अंदाज अपना-अपना', 'हम साथ-साथ हैं', 'दुल्हन हम ले जाएंगे' आणि 'चल मेरे भाई' यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. (What movies did Karisma Kapoor and Salman Khan do together?)
(नक्की वाचा:10 दिवस लग्न, 126 देशातील पाहुणे, 100 कोटी खर्च! कोण होता संजय कपूरच्या पत्नीचा पहिला नवरा?)
लग्नानंतर चित्रपटसृष्टीला ठोकला रामराम
करिश्मा कपूरने लग्नानंतर सलमान खानसोबत एकही चित्रपट केला नाही. खरं तर, लग्नानंतर तिने फारसे चित्रपट केले नाहीत. 2003 मध्ये लग्न केल्यानंतर ती 'मेरे जीवन साथी' या चित्रपटातून तिने कमबॅक केलं होतं. त्यानंतर ती 'डेंजरस इश्क' (2012) मध्ये आणि त्यानंतर थेट 12 वर्षांनंतर ती 'मर्डर मुबारक' (2024) मध्ये दिसली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world