- चित्रपट निर्माता रोहित शेट्टी यांना २० कोटींच्या खंडणीसाठी धमकी देण्यात आली होती
- धमकीचा ऑडिओ संदेश पाकिस्तानमध्ये आधारित व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क वापरून पाठवण्यात आला
- ऑडिओ रेकॉर्डिंग भारतात झाल्याचा अंदाज पोलिसांचा असून धमकी पाठवणाऱ्याने देशाबाहेरून आल्याचा भास निर्माण केला
चित्रपट निर्माते रोहित शेट्टी यांच्याकडे 20 कोटींची खंडणी मागण्यात आली होती. त्यासाठी त्यांनी धमकी देण्यात आली. याचा तपास मुंबई क्राईम ब्रँच करत होती. या तपासात मुंबई पोलिसांच्या हाती एक धक्कादायक माहिती लागली आहे. शेट्टी यांना धमकीच्या ऑडिओ संदेशचे थेट पाकिस्तान कनेक्शन समोर आले आहे ही धमकी पाकिस्तानशी संबंधित 'व्हर्च्युअल प्रायव्हेट नेटवर्क' म्हणजेच VPN द्वारे पाठवण्यात आला होता. धमकी पाठवणाऱ्याची ओळख लपवण्यासाठी व्हिपीएनचा वापर केला.शिवाय तपासाची दिशा भरकटवली जावी यासाठी हा मार्ग अवलंबला गेला होता.
धमकी देताना खाजगी VPN चा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे हा ऑजीओ मेसेज नेमका कुठून पाठवण्यात आला हे ओळखता येत नाही. ते शोधून काढणे हे मुंबई पोलिसांसमोर मोठे आव्हान ठरत आहे. आतापर्यंतच्या तपासावरून असे दिसून येते की रोहित शेट्टी यांना जी धमकी देण्यात आली, त्यासाठी जो ऑडिओ रेकॉर्ड केला गेला तो भारतातच कुठेतरी रेकॉर्ड केला असावा असा अंदाज पोलिसांचा आहे. त्यानंतर मात्र पाकिस्तान-आधारित VPN वापरून तो त्यांना पाठवण्यात आला. असं करून ही धमकी देशाबाहेरून आल्याचं आरोपींना दर्शवायचं होतं.
गुन्हे शाखेने दिलेल्या माहितीवरून सध्याच्या टप्प्यावर हे प्रकरण एखाद्या संघटीत खंडणीखोर टोळीचे कृत्य वाटत नाही. उलट कुणीतरी केवळ एक अफवा किंवा चेष्टा केल्याचा हा प्रयत्न वाटत असल्याचं म्हटलं आहे. तरीही पोलिसांनी कोणत्याही शक्यतेचा इन्कार केलेला नाही. ते प्रत्येक गोष्टीची आणि शक्यतेची तपासणी करत आहेत. धमकीचा ऑडिओ 'व्हॉइस ॲनालिसिस'साठी फॉरेन्सिक प्रयोगशाळेत पाठवण्यात आला आहे. पोलीस या आवाजाचा नमुना कथित गँगस्टर साथीदार शुभम लोणकर याच्या आवाजाशीही जुळवून पाहत आहेत. लोणकरचे लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंध आहेत. फॉरेन्सिकचा अहवाल आल्यानंतर पुढील निष्कर्ष काढता येणार आहे.
फोन करणाऱ्या व्यक्तीने रोहित शेट्टी यांच्याबद्दलची विशिष्ट माहिती देऊन धमकी खरी असल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला असा तपासत समोर आला आहेय. यामध्ये त्यांची लॅम्बोर्गिनी कार, मुंबईतील जुहू परिसरातील निवासस्थान, घराबाहेर तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांची संख्या आणि त्यांच्या गणवेशाचा रंग यांसारख्या तपशीलांचा आरोपीने बारकाईने निरीक्षण केलं होता. रोहित शेट्टी यांच्या निवासस्थानाबाहेर सुरक्षेशी संबंधित एक गंभीर घटना घडल्यानंतर काही महिन्यांनी ही नवीन धमकी आली आहे. या वर्षी फेब्रुवारीमध्ये, लॉरेन्स बिश्नोई टोळीशी कथित संबंध असलेल्या शूटरनी या चित्रपट निर्मात्याच्या जुहू येथील घराबाहेर गोळीबार करण्यात आली होती. पोलिसांनी नंतर या प्रकरणात 15 आरोपींना अटक केली होती. त्या सर्वांवर मकोका अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले होते.पुढील तपास मुंबई गुन्हे शाखेच्या माध्यमातून सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world