Arbaz Shaikh Family News: सैराट चित्रपट अभिनेत्याला मोठा धक्का, अख्ख्या कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर

‘सैराट’ चित्रपटातून घराघरात पोहोचलेला अभिनेता अरबाज शेख (सल्या) याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे वडील अस्लम शेख यांचे उपचारा दरम्यान निधन झाले.

जाहिरात
Read Time: 2 mins
Arbaz Shaikh Father Death News Latest

Arbaz Shaikh Father Death News: ‘सैराट' चित्रपटातून घराघरात पोहोचलेला अभिनेता अरबाज शेख (सल्या) याच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याचे वडील अस्लम शेख यांचे उपचारादरम्यान निधन झाले. गेल्या महिनाभरापासून त्यांच्यावर मेंदूशी संबंधित आजारावर सोलापूरमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. वडिलांना वाचवण्यासाठी अरबाजने शक्य ते सर्व प्रयत्न केले, मात्र अखेर त्यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपुरी ठरली.

वडिलांच्या निधनाच्या जवळपास 20 दिवसांपूर्वी अरबाजने सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ शेअर केला होता. त्यामध्ये तो अश्रू अनावर झालेल्या अवस्थेत,“मला माझ्या बापाला मरताना पाहायचं नाहीये”असे म्हणत मदतीचे आवाहन करताना दिसला होता. हा व्हिडिओ काही तासांतच मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला.

Advertisement

नक्की वाचा >> Kalyan News: कल्याण हादरलं! सुभाष मैदानात विद्यार्थीनीसोबत अत्याचाराचा प्रयत्न, गुरुपोर्णिमेचा कार्यक्रम अन्..

काही तासांनंतर अरबाजने तो व्हिडिओ हटवला

या व्हिडिओत अरबाजने उपचारादरम्यान रुग्णालयाच्या मेडिकलमधूनच औषधे खरेदी करण्याची सक्ती होत असल्याचा आरोप केला होता. बाहेर कमी किमतीत मिळणारी औषधे रुग्णालयाच्या मेडिकलमधून अधिक दराने घ्यावी लागत असल्याचा दावा त्याने केला होता. या प्रकरणाची अन्न व औषध प्रशासनाने दखल घेत संबंधित मेडिकलची तपासणी करून कारवाई केली होती. मात्र, काही तासांनंतर अरबाजने तो व्हिडिओ हटवला. 

नक्की वाचा >> Shirdi News: शिर्डीच्या साईबाबा मंदिरात सुवर्णदानाचा वर्षाव, सोन्याचे अलंकार पाहून साईभक्तही झाले अवाक

त्यावेळी त्याने सोशल मीडियावर स्पष्टीकरण देत सांगितले की, सध्या वडिलांची प्रकृती आणि कुटुंब हीच आपली प्राथमिकता असून प्रशासनानेही या प्रकरणाची दखल घेतल्यामुळे हा विषय पुढे न वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.दरम्यान, वडिलांच्या उपचारांसाठी विविध स्तरांतून मदतीचा हातही पुढे आला होता. मात्र, सर्व प्रयत्नांनंतरही अस्लम शेख यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनाने अरबाज शेख आणि त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला असून सोशल मीडियावर चाहत्यांकडून शोक व्यक्त केला जात आहे.