Kalyan Crime News Today : कल्याणमध्ये एक अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे. केडीएमसी मुख्यालय परिसरात असलेल्या शाळेत गुरुपोर्णिमेनिमित्त एका कार्यक्रम पार पडला. सुभाष मैदान परिसरात फिरत असताना एका नराधमाने 14 वर्षाच्या विद्यार्थिनीसोबत अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्न केला. ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. बाजारपेठ पोलिसांनी एका तासात या प्रकरणातील आरोपी भावेश आहिरला बेड्या ठोकल्या आहेत.
पोलिसांनी आरोपी भावेशला एका तासात केली अटक
विद्यार्थिनी मैदान परिसरात फिरत असताना तिला एक तरुण भेटला. तुला नवीन कपडे घेऊन, देतो मोबाईल घेऊन देतो, असे सांगून तिचा हात पकडला आणि तिला उद्यानात ओढले. पाऊस सुरू असल्याने सध्या सुभाष मैदानात लोकांची वर्दळ नसते. मात्र केडीएमसी मुख्यालय आणि सुभाष मैदान याची भिंत एकच आहे .तरुणाने विद्यार्थीनीसोबत अतिप्रसंग करण्याच्या प्रयत्न केला . बाजारपेठ पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करत आरोपी भावेशला एका तासात अटक केली. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.
नक्की वाचा >> Shirdi News: शिर्डीच्या साईबाबा मंदिरात सुवर्णदानाचा वर्षाव, सोन्याचे अलंकार पाहून साईभक्तही झाले अवाक
या उद्यानात पाच वाजेनंतर नशेखोरांचा वावर असतो. गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक नागरिक राजकीय पक्षाचे पदाधिकारी महापालिकेला तक्रार करत आहेत. मात्र केडीएमसी आयुक्तांनी अद्याप या प्रकरणात कोणतीही कारवाई केली नाही. आता हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आरोपीबाबत सर्व माहिती काढली जात आहे .त्याच्या शोध बाजारपेठ पोलीस करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world