Bigg Boss 19 Pranit More: बिग बॉस सीझन 19चा ग्रँड फिनाले शानदार पद्धतीने पार पडला. यंदाचा सीझन छोट्या पडद्यावरील अभिनेता गौरव खन्नाने जिंकलाय. बिग बॉसच्या ग्रँड फिनालेमध्येच सलमान खानने त्याचा बहुप्रतीक्षित आणि बहुचर्चित 'किक-2' सिनेमाचीही घोषणा केली. यावेळेस सिनेमासाठी प्रणित मोरेचं नाव शिफारस करणार असल्याचंही सलमानने म्हटलं. पण खरंच सलमान असं करणार आहे की त्याने मस्करी केली? नेमकं काय घडलंय...
सलमान खानकडून 'किक 2' सिनेमाची घोषणा
बिग बॉस सीझन 19 ग्रँड फिनालेमधून प्रणित मोरे आऊट झाला, त्यावेळेस त्याला बॅगेजसंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. त्यावर प्रणित म्हणाला की, माझं एक बॅगेज होते की मी बॉलिवूडमधील अनेक कलाकारांवर जोक केले होते. तर ते बॅगेज देखील मी इथेच सोडून जातोय. त्यावर सलमानने लगेच म्हटलं की, "थांब, ते बॅगेज आम्ही रिकामं करू, ती आमची जबाबदारी आहे. आता मी 'किक 2' सिनेमा करतोय आणि तुझ्या नावाची शंभर टक्के शिफारस करणार आहे". सलमान असं म्हणताच प्रणित मोरेसह उपस्थितांपैकी कोणालाच हसू आवरलं नाही.
(नक्की वाचा: Bigg Boss 19 Pranit More Earning: 'बिग बॉस' गाजवणाऱ्या प्रणित मोरेला शोमधून किती पैसे मिळाले?)
कसा होता प्रणित मोरेचा बिग बॉस 19मधील प्रवास, पाहा व्हिडीओ
'किक 2' सिनेमा कधी रिलीज होणार?
सलमान खानचा 'किक' सिनेमा 2014 मध्ये बॉक्सऑफिसवर झळकला होता. सिनेमामध्ये सलमानने देवी लाल सिंह ही भूमिका निभावली होती. प्रेक्षकांना हा सिनेमा प्रचंड आवडला होता, सिनेमाच्या सीक्वेलची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. 4 ऑक्टोबर 2024 रोजी नाडियाडवाला ग्रँडसन एंटरटेनमेंटने अधिकृत इंस्टाग्राम हँडलवर सिकंदर सिनेमाच्या सेटवरील सलमान खानचा एक फोटो शेअर केला होता. या पोस्टद्वारे 'किक 2' सिनेमाची घोषणा करण्यात आली होती. दरम्यान सिनेमाच्या रिलीजबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.