Bigg Boss 19: हिंदी रिॲलिटी शो Bigg Boss 19 च्या विजेतेपदाची माळ अभिनेता गौरव खन्ना याच्या गळ्यात पडली आहे. (Gaurav Khanna Bigg Boss 19 Winner) या शोमध्ये फरहाना भट्ट (Farrhana Bhatt) दुसऱ्या क्रमांकावर होती तर स्टँडअप कॉमेडिअन प्रणित मोरे हा तिसऱ्या क्रमांकावर होता. तान्या मित्तल (Tanya Mittal) चौथ्या स्थानी राहिली तर अमाल मलिक (Amaal Malik) हा पाचव्या स्थानी राहिला. हा रिॲलिटी शो जिंकणाऱ्या गौरव खन्ना याला 50 लाखांचे बक्षिस आणि ट्रॉफी देण्यात आली.
Bigg Boss 19 मुळे बराच मसाला मिळाला!
Bigg Boss 19 या रिॲलिटी शोचा निकाल लागल्यानंतर बोलताना प्रणित मोरे याने म्हटले की, या शोमुळे मला स्टँडअप कॉमेडीसाठी बराच मसाला मिळालाय. गौरव जसं म्हणायचा की या शोसाठी शोधून शोधून स्पर्धक निवडले आहेत. अशी माणसं बाहेर सापडणार नाहीत. एक वर्ष नवा शो बनवेन आणि त्यातून पैसे कमावेन. प्रणितने सांगितलं की त्याला पहिल्या तीनामध्ये येऊ अशी अजिबात शक्यता वाटत नव्हती. हा शो सुरू असताना प्रणित आजारी पडला होता आणि यामुळे त्याला घराबाहेर जावं लागलं होतं. बरा झाल्यानंतर प्रणित पुन्हा शोमध्ये परतला होता. प्रणितने म्हटलं की, "सुरूवातीला मला वाटत होतं की मी यांच्यासोबत फिट होणार नाही. दालवरून लफडी व्हायची, अंड्यावरून लफडी व्हायची. असं प्रत्यक्ष आयुष्यात कधी व्हायचं नाही. मी बाहेर कधीच रडत नाही, मात्र तिथे माझ्या अश्रूंचा बांध फुटला. सुरूवातीला वाटत होतं, की बाहेर गेलेलंच चांगलं असेल. मात्र मला जो पाठिंबा मिळत होता ते पाहून मला वाटलं की आपण पुढे गेलं पाहीजे."
खूप पैसे मिळाले तर ॲक्टींग करेन!
Bigg Boss 19 मध्ये संधी मिळालेल्या स्पर्धकांना अनेकदा अभिनयाची संधी मिळताना दिसते. प्रणितला अशी संधी आली तर ॲक्टींग करणार का? असा सवाल विचारला असता त्याने म्हटले की, मला खूप पैसे दिले आणि ॲक्टींग शिकवली तरच अॅक्टींगमध्ये येईन. यापुढे मी महाराष्ट्र आणि इंडियाची टूर करण्याची योजना आखतोय. युके, न्यूझीलँड ऑस्ट्रेलिया टूरही राहिली होती, ती देखील मला करायची आहे.
प्रणित मोरेने Bigg Boss 19 मधून किती कमाई केली ?
इतर प्रतिस्पर्ध्यांच्या तुलनेत प्रणित मोरेला कमी मानधन मिळाले आहे. प्रणित मोरे याला दर आठवड्याला 1 ते 2 लाख रुपये मानधन मिळत होते. प्रणित मोरे 14 आठवडे Bigg Boss 19 च्या घरात होता, त्यामुळे त्याने अंदाजे 14 ते 28 लाखांच्या घरात कमाई केली असावी असा अंदाज आहे. डेक्कन क्रोनिकलच्या बातमीमध्ये त्याच्या कमाईचा अंदाजे आकडा प्रसिद्ध करण्यात आला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world