Salman Khan House Firing Case: आरोपींकडे होती 40 काडतुसे, गोळीबारानंतर 3 वेळा बदलले कपडे

Salman Khan House Firing Case: "सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींकडे जवळपास 40 काडतुसे होती, यापैकी 5 गोळीबारासाठी वापरण्यात आली. तर 17 काडतुसे जप्त केली आणि उर्वरित 18 काडतुसांचा शोध सुरू आहे", अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

जाहिरात
Read Time: 3 mins

Salman Khan House Firing Case: बॉलिवूडचा भाईजान सलमान खानच्या (Salman Khan) घराबाहेर झालेल्या गोळीबारप्रकरणी (Salman Khan House Firing Case) अटक केलेल्या दोन्ही आरोपींना गुरुवारी (25 एप्रिल) सुनावणीकरिता कोर्टासमोर हजर करण्यात आले होते. कोर्टाने आरोपींना 29 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान क्राइम ब्रांचने (Mumbai Crime Branch) कोर्टामध्ये सांगितले की, "गोळीबार केल्यानंतर दोन्ही आरोपींनी स्वतःचे कपडे तीन वेळा बदलले. गोळीबार करून पळ काढताना त्यांनी सर्वप्रथम वांद्रे, यानंतर सांताक्रूझ आणि सूरतमध्ये कपडे बदलले. तसेच कोणीही ओळखू नये, यासाठी त्यांनी स्वतःचा वेश बदलण्याचाही प्रयत्न केला".  

(नक्की वाचा: अब मेरा समय आया है!...  Kalki 2898 ADच्या टीझरसह अमिताभ बच्चन यांचा लुक चर्चेत)

सलमान खानच्या घराबाहेर कधी केला होता गोळीबार?

या दोन्ही आरोपींनी वांद्रे येथील सलमान खानच्या घराबाहेर 14 एप्रिल रोजी पहाटे 5 वाजण्याच्या सुमारास गोळीबार केला होता. बाइकवरून आलेल्या दोघांनी सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर पाच वेळा गोळ्या झाडल्या. गोळीबारादरम्यान सलमान खान घरामध्येच होता. या घटनेनंतर सलमान खानच्या घराबाहेर कडेकोट सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

(नक्की वाचा: अभिनेत्री तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ! सायबर सेलने बजावले समन्स, काय आहे कारण?)

आरोपींजवळ होती एकूण 40 काडतुसे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही आरोपींजवळ एकूण 40 काडतुसे होती. यापैकी त्यांनी पाच गोळीबार करण्यासाठी वापरल्या. 17 काडतुसे जप्त करण्यात आली असून उर्वरित 18 काडतुसांचा शोध घेतला जात आहे. आरोपींना आर्थिक मदत कोण पुरवत आहे, याचीही चौकशी करावी; अशी मागणी यावेळेस सरकारी वकिलांनी केली आहे.   

Advertisement

सलमानसोबत नव्हते वैर

सरकारी वकिलांनी कोर्टासमोर म्हटले की, "हे दोन्ही आरोपी मूळचे बिहार राज्यातील रहिवासी आहेत. अशा परिस्थितीत दोघांना आर्थिक मदत कोण करत होते? याची माहिती शोधावी लागेल. तसेच या दोघांचंही सलमान खानसोबत कोणतेही वैर नव्हते. मग त्यांनी त्याच्या घरावर गोळीबार का केला? त्यांना कोण आणि कसे आदेश देत होते? हेही शोधावे लागेल. राजस्थान, पंजाब, हरियाणामधून त्यांच्या संपर्कात कोण आहे? जे कोणी संपर्कात आहेत, त्यांची पार्श्वभूमी काय आहे? याचा तपास करावा लागेल.

(नक्की वाचा: 18 वर्षांपूर्वी आमीर खानच्या मुलाची साकारली भूमिका, आता इतका हँडसम दिसतोय हा मुलगा)

आरोपींकडून एक मोबाइल जप्त

पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपींजवळ दोन मोबाइल होते, यापैकी एक मोबाइल जप्त केला आहे तर दुसऱ्या फोनचा शोध घेतला जात आहे. मोबाइलच्या माध्यमातून आरोपी तिसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात होते. ही मंडळी कोणत्या व्हायफाय सुविधेद्वारे इंटरनेटचा वापर करत होते, याचीही चौकशी करायची आहे".

Advertisement

आरोपींच्या वकिलांकडून न्यायालयीन कोठडीची मागणी 

"आरोपी तपास प्रक्रियेमध्ये सहकार्य करत आहेत. त्यांना जितके माहीत होते, तितके सारे काही त्यांनी पोलिसांना सांगितले. यामुळे त्यांना न्यायालयीन कोठडी देण्यात यावी", अशी मागणी आरोपींच्या वकिलांनी कोर्टासमोर केली.  

आरोपींनी पनवेलमध्ये घेतले होते घर

दोन्ही आरोपी पनवेलमध्ये भाडेतत्त्वावरील एका घरामध्ये राहत होते. पनवेलमध्ये सलमान खानचे फार्महाऊस देखील आहे. त्यामुळे सलमानच्या फार्महाऊसलाच त्यांना टार्गेट करायचं होतं का? असाही प्रश्नही उपस्थित केला जात आहे. 

आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचा पोलिसांचा संशय 

पोलिसांना कोर्टात असेही म्हटले की,"हे आंतरराष्ट्रीय रॅकेट असल्याचा संशय आहे. त्यांचे बिहार आणि गुजरात राज्यांमध्येही संपर्क आहेत. आम्हाला  हरियाणा, पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार आणि गुजरात राज्यांमध्ये तपास वाढवायचा आहे".  

Advertisement

अनमोल बिश्नोईविरोधात LOC जारी करण्यासाठी अर्ज 

या प्रकरणी मुंबई क्राइम ब्रांचने केंद्रीय गृह मंत्रालयाशी पत्रव्यवहार करून गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोईविरोधात LOC जारी करण्यासाठी अर्ज केला आहे. सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर काही तासांतच अनमोल बिश्नोईने फेसबुकवर पोस्ट शेअर करत या घटनेची जबाबदारी स्वीकारली होती.  

VIDEO: Salman Khanच्या घरावर गोळीबार, अटक झालेल्या आरोपींचा बिश्नोई गँगशी काय संबंध?

Topics mentioned in this article