जाहिरात

Salman Khan: सलमानच्या एका पोस्टने CJP आंदोलनाची हवा ठरवली, 'त्या' पोस्टने रचला सोशल मीडियावर नवा इतिहास

हा ट्रेंड पाहाता या आंदोलनाला किती मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे याचा अंदाज येतो.

Salman Khan: सलमानच्या एका पोस्टने CJP आंदोलनाची हवा ठरवली, 'त्या' पोस्टने रचला सोशल मीडियावर नवा इतिहास
मुंबई:

NEET पेपर लीक आणि CJP आंदोलनावर सलमान खानची भावूक पोस्ट केली होती. या पोस्टवर  सोशल मीडियावर व्ह्यूजचा विक्रम मोडीत काढला आहे. NEET पेपर लीक प्रकरणामुळे देशभरात वातावरण चांगलेच तापले आहे. मोठ्या प्रमाणात विद्यार्थी दिल्लीत दाखल होत आहेत. या तापलेल्या वातावरणात बॉलिवूड अभिनेता सलमान खानने (Salman Khan) सोशल मीजियावर एक पोस्ट केली होती. ही पोस्ट चांगलीच चर्चेत आली आहे. बुधवार, 22 July रोजी सलमान खानने इन्स्टाग्राम आणि X (ट्विटर) वर ही पोस्ट केली होती. त्यात त्याने आंदोलक विद्यार्थ्यांचे समर्थन केले होते. ऐवढेच नाही तर देशाच्या शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याची मागणी केली होती. 

सलमान खानचा चाहता वर्ग मोठ्या प्रमाणात आहे. त्याने ही पोस्ट केल्यानंतर  या पोस्टने सोशल मीडियावर नवा इतिहास रचला आहे. X वर या पोस्टला 14 Million पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. तर इन्स्टाग्रामवर 2.5 Million हून अधिक लाईक्स आणि 70,000 पेक्षा जास्त कमेंट्स आल्या आहेत. हा एक विक्रम मानायला हवा. X वर 'Salman Khan' हा हॅशटॅग सतत ट्रेंड होत आहे. त्यावर 10,000 हून अधिक युझर्सने आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. या ट्रेंड पाहाता या आंदोलनाला किती मोठ्या प्रमाणात समर्थन मिळत आहे याचा अंदाज येतो. 

नक्की वाचा - Salman Khan Backs CJP: बॉलिवूड सुपरस्टार सलमान खानचा CJP आंदोलनाला पाठिंबा! "पेपर लीक हा गंभीर विषय, पण..."

आपल्या पोस्टमध्ये सलमानने लिहिले, "हे आंदोलन अत्यंत शांततापूर्ण मार्गाने सुरू होते. दुर्दैवाने या आंदोलनाला हिंसक वळण आले आहे.  याचे मला खूप दुःख आहे. जे विद्यार्थी आणि पालक यामध्ये जखमी झाले आहेत, त्यांच्याबद्दल मी सहसंवेदना व्यक्त करतो. पेपर लीक हा अत्यंत गंभीर विषय आहे. देशातील मुले चांगल्या शिक्षण व्यवस्थेसाठी एकत्र आली आहेत. पालक त्यांना पाठिंबा देत आहेत, हे पाहून आनंद झाला."  अशा शब्दात त्यांना आपला पाठींबा या आंदोलनाला दिला आहे. 

नक्की वाचा - VIDEO: मस्ती जिरली! महिला आंदोलकाच्या कानाखाली मारणाऱ्या DCP ला दणका; हायकोर्टाच्या ताशेऱ्यांनंतर कारवाई

सलमान खानने पुढे लिहिले की, "शिक्षण हा पुढील ट्रेंड आणि फॅशन बनला पाहिजे. दरवर्षी ते अधिक ट्रेंडिंग झाले पाहिजे, जेणेकरून दुसऱ्या देशांतील लोक भारतात शिकण्यासाठी येतील आणि भारत एक ग्लोबल एज्युकेशनल हब बनेल." या आंदोलनाला राजकीय रंग न देता सरकारने विद्यार्थ्यांना पूर्ण पाठिंबा द्यावा, अशी अपेक्षाही त्याने व्यक्त केली. त्याच्या या पोस्टचे तरुणाने दिलखूलास पणे स्वागत केले आहेत. त्यामुळे या पोस्टवर लाईक आणि कमेंटचा पाऊस पडला आहे. त्यामुळे या आंदोलनाची दिशा काय आहे हे स्पष्ट होत आहे. 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com