Salman Khan Health: सलमान खानला झालंय तरी काय? 5 फोटो शेअर करत चिंतेत असलेल्या फॅन्सना दिलं उत्तर

सलमान खानच्या काही व्हायरल फोटोंमुळे त्याच्या तब्येतीबाबत सोशल मीडियावर उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. या चर्चांना पूर्णविराम देत सलमानने स्वतः सोशल मीडियावर 5 नवीन ब्लॅक अँड व्हाईट फोटो शेअर केले आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

Salman Khan: बॉलिवूडचा 'दबंग' अभिनेता सलमान खान याच्या तब्येतीविषयी गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली होती. एका सार्वजनिक कार्यक्रमादरम्यानचे सलमानचे काही फोटो आणि व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाले होते. ज्यात सलमान खान आधीपेक्षा बारीक दिसत आहे. त्याचं वजनदेखील कमी झालं आहे. याशिवाय तो खोकतानाही दिसत आहे. त्यामुळे सलमान खानला कोणता आजार झालाय की काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. 

या सर्व चर्चांदरम्यान, आता स्वतः सलमान खानने सोशल मीडियावर एन्ट्री घेत चाहत्यांना त्यांच्या तब्येतीचा हालचाल विचारला आहे. सलमानने इन्स्टाग्रामवर त्याचे 5 नवीन फोटो शेअर करत या चर्चांना स्वतःच्या स्टाईलमध्ये उत्तर दिले आहे.

Advertisement

सलमानचे ब्लॅक अँड व्हाईट फोटो व्हायरल

सलमान खानने शेअर केलेले हे 5 नवीन फोटो ब्लॅक अँड व्हाईट आहेत. या फोटोंमध्ये सलमानने डोक्यावर एक स्टायलिश हॅट घातलेली असून, त्याची हलकी वाढलेली दाढी पाहायला मिळत आहे. या फोटोंमध्ये भाईजानचा नेहमीचा स्वॅग आणि डॅशिंग लूक दिसून येत आहे.

हे फोटो शेअर करताना सलमानने कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "तुमची तब्येत कशी आहे?". सलमानने चाहत्यांना विचारलेल्या या प्रश्नावर त्याचे चाहते कमालीचे खुश झाले असून, कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे.

त्या व्हायरल फोटोंमुळे चाहते का झाले होते चिंतेत?

काही दिवसांपूर्वी सलमान खान एका कार्यक्रमात तपकिरी रंगाचा लूज शर्ट घालून पोहोचला होता. गेल्या तीन दशकांहून अधिक काळ आपल्या फिटनेस आणि चमकदार चेहऱ्याने करोडो चाहत्यांना भुरळ घालणारा सलमान या कार्यक्रमात थोडा वेगळा दिसत होता. त्याच्या चेहऱ्यावरील चमक कमी झाल्याचे आणि सुरकुत्या स्पष्ट दिसत असल्याचे नेटकऱ्यांच्या नजरेतून सुटले नाही.

Advertisement

(नक्की वाचा-  Mumbai News: मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी! तलावांमधील पाणीसाठ्यात मोठी वाढ; चिंता मात्र कायम?)

सलमान खान आता वयाची साठी ओलांडला आहे. त्यामुळे वयोमानानुसार चेहऱ्यावर बदल होणे स्वाभाविक आहे. मात्र, इंडस्ट्रीतील सर्वात हँडसम अभिनेत्यांपैकी एक असलेल्या भाईजानला अशा रूपात पाहून त्याचे चाहते चिंतेत पडले होते आणि त्याच्या प्रकृतीबाबत अफवांना उधाण आले होते. मात्र, नवीन फोटोंमुळे चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.
 


Topics mentioned in this article