"ऐश्वर्या रायमुळे सलमान खान..", 'हम दिल दे चुके सनम' अभिनेत्रीचा खुलासा, "तो प्रत्येक रात्री यायचा आणि..."

सलमान खान ऐश्वर्या रायच्या वागणुकीमुळे खूप त्रस्त होता. त्यांच्या रिलेशनशिपबद्दल अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनी मोठा खुलासा केला होता.तिने म्हटलं होतं की..

जाहिरात
Read Time: 2 mins
Salman khan Aishwarya Rai Affair
मुंबई:

Salman Khan And Aishwarya Rai Love Story :  "ऐश्वर्या राय आणि सलमान खान एकेकाळी बॉलिवूडमधील पॉवर कपलपैकी एक होते.‘हम दिल दे चुके सनम' या चित्रपटापासून त्यांच्या प्रेमकहाणीला सुरुवात झाली.पण त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. दोघांमध्ये अनेक गोष्टींवरून मतभेद निर्माण झाल्याने त्यांचं ब्रेकअप झालं,असं सांगितलं जातं.सलमान खान ऐश्वर्या रायच्या वागणुकीमुळे खूप त्रस्त होता. त्यांच्या रिलेशनशिपबद्दल अभिनेत्री हिमानी शिवपुरी यांनी मोठा खुलासा केला होता.तिने म्हटलं होतं की,सलमान ऐश्वर्याला भेटण्यासाठी चित्रपटाच्या सेटवर  यायचा.हिमानी यांनी रेड एफएमला दिलेल्या मुलाखतीत सलमान आणि ऐश्वर्याच्या नात्याबद्दल माहिती दिली होती." 

"सलमान रोज भेटायला यायचा आणि.."

हिमानी शिवपुरी म्हणाल्या होत्या, एक काळ असा होता जेव्हा सलमान आणि ऐश्वर्याचं नातं खूप घट्ट होतं. 
त्यामुळे सलमान दररोज रात्री यायचा आणि सकाळी निघून जायचा.पण सलमान ऐश्वर्याबद्दल खूपच पझेसिव्ह होता. तो वारंवार सेटवर येत असल्याने ही बाब उघड झाली होती. 

पण जेव्हा दोघांच्या नात्यात तणाव निर्माण झाला,तेव्हा सलमान ऐश्वर्यामुळे त्रस्त झाला होता.हिमानीला याबाबत सर्वकाही माहित झालं होतं.जेव्हा ऐश्वर्या अभिषेक बच्चनसोबत रोहन सिप्पीच्या एका प्रोजेक्टचे शूटिंग करत होती, तेव्हा सलमान अचानक तिथे आला आणि ऐश्वर्याच्या वागणुकीवर त्याने नाराजी व्यक्त केली होती. सलमानने हिमानीला सांगितलं होतं की,ऐश्वर्याचा समजव..वहीदा रहमानकडे बघ. स्वतःला खूप सुंदर समजते. तेव्हा हिमानीने सलमानला शांत राहण्याचा सल्ला दिला होता. 

नक्की वाचा >> रेहमान डकैतचा मित्र पहिल्यांदाच आला समोर! धुरंधर पाहून पाकिस्तानचा बुरखाच फाडला, म्हणाला, "पाकिस्तानने.."

ऐश्वर्याने ब्रेकअपबद्दल मौन तोडलं

सलमान खानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर ऐश्वर्याने एका मुलाखतीत म्हटलं होतं की, सलमान आणि माझं ब्रेकअप झालं होतं. तेव्हा तो हे मान्य करू शकत नव्हता.ब्रेकअपनंतर तो मला फोन करायचा आणि निरर्थक गोष्टी बोलायचा. माझं को-स्टार्ससोबत अफेअर असल्याचा संशय त्याला होता.माझं नाव अभिषेक बच्चनपासून शाहरुख खानपर्यंत सगळ्यांसोबत जोडलं गेलं.अनेकदा सलमानने माझ्याशी हातापाई केली. 

Advertisement

नक्की वाचा >>Raigad News मंगेश काळोखे हत्याप्रकरणी मोठा ट्वीस्ट, तो व्हिडीओ आला समोर, आमदार महेंद्र थोरवेंचं खळबळजनक विधान!