जाहिरात

Raigad News मंगेश काळोखे हत्याप्रकरणी मोठा ट्वीस्ट, तो व्हिडीओ आला समोर, आमदार महेंद्र थोरवेंचं खळबळजनक विधान!

रायगडचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशातच या हत्याप्रकरणातील धक्कादायक सीसीटीव्ही समोर आला आहे. 

Raigad News मंगेश काळोखे हत्याप्रकरणी मोठा ट्वीस्ट, तो व्हिडीओ आला समोर, आमदार महेंद्र थोरवेंचं खळबळजनक विधान!
Mangesh Kalokhe Murder Case CCTV Video
मुंबई:

मेहबुब जमादार, प्रतिनिधी

Mangesh Kalokhe Murder CCTV Video : रायगड जिल्ह्यातील खोपोली येथील मंगेश काळोखे हत्याप्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. नुकत्याच पार पडलेल्या खोपोली नगरपरिषदेच्या निवडणुकीत मंगेश काळोखे यांच्या पत्नी मानसी काळोखे निवडून आल्या. त्यानंतर काही दिवसांनीच त्यांचे पती मंगेश काळोखे यांची निर्घृण हत्या करण्यात आली. या हत्याप्रकरणात रायगडचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशातच या हत्याप्रकरणातील धक्कादायक सीसीटीव्ही समोर आल्यानं मोठा ट्वीस्ट निर्माण झाला आहे. या हत्याप्रकरणाबाबत शिवसेना शिंदे गटाचे कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी मोठी प्रतिक्रिया दिली आहे.

आमदार महेंद्र थोरवे एनडीटीव्ही बोलताना काय म्हणाले?

आमदार महेंद्र थोरवे एनडीटीव्ही मराठीशी बोलताना म्हणाले, "मंगेश काळोखे यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांना पराभव जिव्हारी लागल्याने त्यांनी एकत्रितपणे येऊन मंगेश काळोखेंची हत्या केली. धारदार हत्यारांनी मंगेशची हत्या करण्यात आली आहे. एवढं सगळं होऊन सुद्धा सुनील तटकरे कर्जतमध्ये आले होते.त्यांनी जाहरीरपणे या ठिकाणी सांगितलं की, सुधाकर घारे यांचा या हत्येशी काहीही संबंध नाहीय. सुधाकर घारे आणि त्यांच्या कार्यकर्त्यानींच मंगेशची हत्या केली. त्यांना वाचवण्यासाठी सुनील तटकरे कर्जतमध्ये आले. पोलिसांचा तपास अजूनपर्यंत पूर्ण झालेला नाही.तरीसुद्धा सुनील तटकरे घाईघाईत प्रतिक्रिया देऊन त्या ठिकाणी गेलेले आहेत. तपासयंत्रणांचा तपास पूर्ण झालेला नाही."

"सुधाकर घारेच्या चुलत भावाने महेंद्र घारेनं यांनी असे कमेंट्स केले की, दुसरा नंबर हा भासेचा लागणार आहे. संकेत भासे हा माझा भाचा आहे. जो कायदेशीर काम पाहतो. तो कर्जतमध्ये नगरसेवक आहे. त्याला सुद्धा मारण्याचा दुसरा नंबर लावणार आहे. पहिला नंबर मंगेश काळोखेचा लावला, हे सुधाकर घारेचा भाऊ जाहीरपणे कबुल करतोय. मीडियाच्या माध्यमातून माझी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पोलिसांना विनंती आहे की,सुधाकर घारे, महेंद्र घारे आणि भरत भगत यांना तात्काळ अटक झाली पाहिजे. हे दोषी आहेत. त्यांच्यावर मकोका अंतर्गत कारवाई झाली पाहिजे. अशी मागणी आम्ही करत आहोत. शिंदे साहेब स्वत: मंगेश काळोखे यांच्या कुटुंबाचं सांत्वन करण्यासाठी आले होते", असंही थोरवे म्हणाले.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com