नागा चैतन्य आणि शोभिताच्या प्री-वेडिंग सोहळ्यात समांताची एण्ट्री, PHOTOS सोशल मीडियावर व्हायरल

नागा आणि शोभिताच्या लग्नाची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. नागा चैतन्य आणि शोभिताचे लग्न 4 डिसेंबरला हैदराबादमध्ये होणार आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
मुंबई:

अभिनेत्री समांथा रुथ प्रभूपासून घटस्फोट घेणाऱ्या तेलुगू अभिनेता नागा चैतन्य याचे अभिनेत्री शोभिता धुलिपालाशी लग्न होणार आहे. या दोघांचे लग्न 4 डिसेंबरला होणार आहे. नागा चैतन्य आणि शोभिताच्या प्री-वेडींग सोहळ्यांना समांताने हजेरी लावली. समांता आणि शोभिताचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. 29 नोव्हेंबर रोजी नागा चैतन्य आणि शोभिताचा हळदीचा कार्यक्रम झाला होता ज्यालादेखील समांथा उपस्थित होती.   

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

डॉ.समांता धुलिपाला ही शोभिताची सख्खी बहीण आहे. पेशाने डॉक्टर असलेली समांता ही प्रसिद्धीपासून तशी दूरच असते. शोभितासोबतचा समांताने फोटो शेअर केल्यानंतर तिच्याबद्दल अनेकांना माहिती मिळाली. नागा चैतन्यची पहिली बायको समांथाशी नामसाधर्म्य असल्याने डॉ.समांताने पोस्ट केलेले फोटो पाहून अनेकजण चक्रावले होते. 

समांता धुलिपालाने नागा चैतन्य आणि शोभिता यांच्या साखरपुड्याचेही फोटो यापूर्वी शेअर केले होते. त्यावेळी फोटो शेअर करताना डॉ.समांताने लिहिले होते की "2022 पासून अनंत काळापर्यंत एकत्र" यावरून शोभिता आणि नागा चैतन्य हे 2022 सालापासून एकत्र असल्याचे कळाले होते. 

नक्की वाचा -  नागाच्या दुसऱ्या लग्नाची पहिली गोष्ट, 4 दिवसांनी होणार शोभिताशी लग्न

नागा आणि शोभिताच्या लग्नाची चर्चा गेल्या काही महिन्यांपासून सुरू आहे. नागा चैतन्य आणि शोभिताचे लग्न 4 डिसेंबरला हैदराबादमध्ये होणार आहे. नागाचे हे दुसरे लग्न असून त्याचे पहिले लग्न सुपरस्टार अभिनेत्री समांथा रुथ प्रभूशी झाले होते.  नागा चैतन्यचे समांथा या नावाशी असलेले नाते काही तुटता तुटत नाहीये. पत्नी समांथाशी घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्यने शोभिताशी लग्न करण्याचा निर्णय घेतला. शोभिताच्या बहिणीचे नाव समांथाशी मिळते जुळते आहे. पहिल्या बायकोचे आणि होणाऱ्या मेहुणीचे नाव हे सारखे असणे हा नागा चैतन्यसाठी एक वेगळाच योगायोग ठरला आहे. 

Advertisement