बॉलिवूड आणि दक्षिण चित्रपट क्षेत्रात जेव्हा राज आणि डी.केचं नाव घेतलं जातं तेव्हा फॅमिली मॅन आणि फर्जी सारख्या ब्लॉकबस्टर सीरिज आठवतात. मात्र सध्या दिग्दर्शक राज निदिमोरू आपल्या कामाऐवजी समंथा रुथ प्रभूसोबतची मैत्री (कदाचित याहून जास्त) यामुळे चर्चेत आहेत. सोशल मीडियावर या दोघांचा एक फोटो व्हायरल झाल्यानंतर चाहत्यांमध्ये कुजबुज सुरू झाली आहे. त्यामुळे चाहत्यांकडूनही अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. यावर काही स्पष्टीकरण नाही मिळालं तरी राजबद्दल काही रंजक गोष्टी जाणून घेऊया.
राजची नेटवर्थ किती?
राज निदिमोरू केवळ हुशारच नाही तर खूप श्रीमंत देखील आहे. अहवालानुसार, २०२५ मध्ये त्याची एकूण संपत्ती सुमारे ८३-८५ कोटी असण्याचा अंदाज आहे. द फॅमिली मॅन, गो गोवा गॉन आणि फर्जी सारख्या हिट चित्रपटांमुळे त्याच्या नेटवर्थमध्ये मोठी वाढ झाली. राज मुंबईत एका आलिशान अपार्टमेंटमध्ये राहतो आणि त्याला महागड्या गाड्यांचाही शौक आहे. त्याचे बहुतेक उत्पन्न चित्रपट, ओटीटी प्रोजेक्ट आणि ब्रँड एंडोर्समेंटमधून येते. एकंदरीत, असे म्हणता येईल की राजचे आयुष्य रील आणि रिअल लाइफ दोन्हीमध्ये उत्तम चालले आहे.
समंथासोबत केमिस्ट्री आणि पहिल्या पत्नीची एन्ट्री...
राजच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचं झालं तर एकीकडे समंथा रुथ प्रभू आहे. तर दुसरीकडे त्याची पहिली पत्नी. राजचा जन्म ४ ऑगस्ट १९७९ मध्ये झाला. तर समंथाचा जन्म २८ एप्रिल १९८७ मध्ये. या दोघांमध्ये ७-८ वर्षांचं अंतर आहे. सोशल मीडियावर दोघांचा फोटो आल्यानंतर चाहते त्यांना पॉवर कपल म्हणत आहेत. त्याची पहिली पत्नी श्यामाली डेदेखील काही कमी नाही. ती रंग दे बसंती आणि ओमकारासारख्या चित्रपटांमध्ये सह दिग्दर्शक होती. याशिवाय ती स्क्रिप्ट रायटरही आहे.