Sana Saeed New Photos: 'कुछ कुछ होता है' या सिनेमामध्ये छोटी अंजलीची भूमिका साकारून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री सना सईद आता 37 वर्षांची झाली आहे. इतक्या वर्षांनंतरही ती आपल्या सौंदर्याने आणि ग्लॅमरस शैलीने चाहत्यांच्या मनावर राज्य करत आहे. साखरपुड्याच्या बातमीने सोशल मीडियावर सना सईद चर्चेत होती. सनाने परदेशी बॉयफ्रेंडसोबत साखरपुडा केली असून त्यांचे फोटो आणि व्हिडीओ समोर आल्यानंतर चाहत्यांनी आनंद व्यक्त केला होता. सिनेमा प्रदर्शित होऊन 28 वर्षे झाली असली तरी आजही प्रेक्षक सनावर भरभरून प्रेम करतात.
सना सईद सोशल मीडियावर सक्रिय
'कुछ कुछ होता है' सिनेमामध्ये निरागस दिसणारी सना सईद आता मोठी झाली आहे. ती सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते आणि सतत आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत असते. सना आता 37 वर्षांची झाली आहे, पण या सिनेमानंतर सनाला अपेक्षेप्रमाणे प्रसिद्धी मिळाली नाही. काही सिनेमांव्यतिरिक्त ती काही डान्स रिअॅलिटी शोमध्येही दिसली, तरीही तिला अपेक्षित यश मिळाले नाही.
(नक्की वाचा: Poonam Pandey Pregnant: पूनम पांडे खरंच प्रेग्नेंट आहे का? बेबी बंप फ्लाँट करत शेअर केले फोटो See Photos)
वर्ष 2023 मध्ये केला बॉयफ्रेंडसोबत साखरपुडा
सना सईदने 2023 मध्ये बॉयफ्रेंड साबा वॉनरसोबत साखरपुडा केला होता. साबा हा हॉलिवूडमध्ये साऊंड डिझायनर कार्यरत आहे आणि लॉस एंजेलिसमधील रहिवासी आहे. सना त्याच्यासोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.