Poonam Pandey Pregnant: आपल्या बोल्डनेस आणि वादग्रस्त विधानांसाठी प्रसिद्ध असलेली अभिनेत्री पूनम पांडे (Poonam Pandey) पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पूनमने सोशल मीडियावर प्लॅटफॉर्मवर स्वतःचा असा काही फोटो शेअर केलाय, तो पाहून नेटकरी अवाक् झाले आहेत. फोटोमध्ये पूनम स्वतःचं बेबी बंप फ्लाँट करताना दिसत आहे, ज्यामुळे ती प्रेग्नेंट असल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
पूनम पांडेच्या इन्स्टाग्राम पोस्टने उडवली खळबळ
पूनमने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोमध्ये ती बेबी बंप दाखवत आहे, तर दुसऱ्या फोटोमध्ये ती कॅमेऱ्यासमोर हसताना दिसत आहे. तिने कॅप्शनमध्ये कोणत्याही शब्दाचा वापर न करता फक्त गर्भवती महिला, दुधाची बाटली आणि बेबी इमोजी पोस्ट केले आहेत. ही पोस्ट येताच कमेंट सेक्शनमध्ये प्रश्नांचा पाऊस पडला आहे. काही लोक तिचे अभिनंदन करत आहेत, तर बहुतेकांना हा तिचा नवा पब्लिसिटी स्टंट वाटत आहे.
(नक्की वाचा: Dhurandhar Vs Dhanandhar Video: रणवीर सिंगचा धुरंधर की अशोक सराफांचा धनंधर? सोशल मीडियावर या व्हिडीओचा धुमाकूळ)
नेटकरी विश्वास करत नाहीयेत, कारण...
पूनमने 31 मार्च रोजी ही पोस्ट शेअर केल्याने अनेकांना हे एप्रिल फूल प्रँक वाटत आहे. काही युजर्सनी हे फोटो AI (आर्टिफिशियल इंटेलिजन्स) द्वारे तयार केल्याचीही कमेंट केलीय. काही युजरने खोचकपणे विचारलंय की, "पण या मुलाचा बाप कोण आहे?" तर दुसऱ्याने लिहिले, "मरण्याचे नाटक केल्यानंतर आता प्रेग्नेंसीचे नाटक? पूनम काहीही करू शकते." काहींनी विश्वास कसा ठेवायचा? असाही प्रश्न उपस्थित केलाय.
(नक्की वाचा: Success Story: 7व्या वर्षी सोडावं लागलं घर; आज आहे कोट्यवधींची मालकीण, मिस इंडिया स्पर्धा ते राजकारण वाचा यशस्वी प्रवास)
जुना वाद काय होता?
चाहत्यांच्या या अविश्वासामागे एक मोठे कारण आहे. वर्ष 2024 मध्ये पूनम पांडेच्या टीमने इन्स्टाग्रामवर माहिती दिली होती की, सर्व्हायकल कॅन्सरमुळे (Cervical Cancer) तिचे निधन झाले आहे. पण दुसऱ्याच दिवशी पूनमने जिवंत समोर येऊन सांगितले होते की, ही केवळ जनजागृती करण्यासाठी तिने हे पाऊल उचलले होते. त्यावेळेस प्रचंड टीका आणि ट्रोलिंगचा तिला सामना करावा लागला होता. त्यामुळेच कदाचित तिच्या प्रेग्नेंसीच्या बातमीवरही लोक सहजासहजी विश्वास ठेवू शकत नाहीत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world