Sandeep Reddy Vanga : "IAS होणे सोपे, फिल्ममेकर होणे सोपे नाही", अॅनिमलच्या डायरेक्टरने असं का म्हटलं?

Sandeep Reddy Vanga : संदीप रेड्डीने पुढे म्हटलं की, पुस्तके काही मोजकीच असतात ना? तुम्ही 1500 पुस्तके वाचाल, त्यानंतर तुम्ही IAS ची परीक्षा पास कराल, मी लिहून देतो.

जाहिरात
Read Time: 2 mins

'अॅनिमल' सिनेमामुळे दिग्दर्शक संदीप वांगा रेड्डीला वारंवार टीकेचा सामना करावा लागला आहे. सिनेमा हिट ठरला तरीही अनेकांना तो आजही खटकतो. आजही लोक संदीप रेड्डीला या सिनेमावरून जाब विचारतात. दरम्यान एका पॉडकास्टमध्ये अॅनिमल सिनेमाबाबत संदीप वांगा रेड्डीने सविस्तर बातचित केली. 'दृष्टी' कोचिंग क्लासेसचे संचालक विकास दिव्यकीर्ती यांनी देखील अॅनिमल सिनेमावर टीका केली होती. त्यांच्या टिकेला देखील संदीप वांगा रेड्डीने उत्तर दिलं आहे.   

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

संदीप रेड्डीने म्हटलं की, "एक व्यक्ती आपल्या जीवनातील काही वर्ष देऊन आणि काही पुस्तके वाचून IAS ची परीक्षा पास करु शकतो. मी खूप प्रामाणिकपणे सांगतो की विनाकारण हल्लाबोल केला तर 100 टक्के राग येणार. मला वाटतं की ते एक IAS अधिकारी आहेत. त्यांनी त्याचा अभ्यास केला आहे. दिल्लीला जाऊन तिथे एका इन्स्टिट्युटमध्ये प्रवेश घेत आणि आपल्या आयुष्यातील 2-3 वर्ष देऊन तुम्ही आयएएस परीक्षा पास होऊ शकता."

(नक्की वाचा-  हातावर मेहंदी, सूटकेसमध्ये मृतदेह; काँग्रेस नेत्याच्या निर्घृण हत्येने खळबळ)

संदीप रेड्डीने पुढे म्हटलं की, पुस्तके काही मोजकीच असतात ना? तुम्ही 1500 पुस्तके वाचाल, त्यानंतर तुम्ही IAS ची परीक्षा पास कराल, मी लिहून देतो. असा कोणता कोर्स नाही, असा कोणता शिक्षक नाही जो तुम्हाला फिल्ममेकर आणि लेखक बनवेल. 

(नक्की वाचा-  Hyperloop Track : अवघ्या अर्ध्या तासात 350 किमीचा प्रवास; देशातील पहिला हायपरलूप टेस्टिंग ट्रॅक तयार)

काय म्हणाले होते विकास दिव्यकीर्ती?

एका मुलाखतीत विकास दिव्यकीर्ती यांनी म्हटलं होतं की, 'अ‍ॅनिमल' सारखे चित्रपट समाजाला 10 वर्षे मागे घेऊन जातात. असे चित्रपट बनवू नयेत. चित्रपटात नायक प्राण्यासारखा वागताना दाखवला आहे. चित्रपटात सामाजिक मूल्ये असली पाहिजेत. लोक फक्त पैशासाठी काम करतात का? असे सिनेमे नाही बनले पाहिजेत.

Topics mentioned in this article