जाहिरात

Hyperloop Track : अवघ्या अर्ध्या तासात 350 किमीचा प्रवास; देशातील पहिला हायपरलूप टेस्टिंग ट्रॅक तयार

hyperloop track in India : हायपरलूप ही एक अत्याधुनिक वाहतूक व्यवस्था आहे, जी व्हॅक्यूम ट्यूबमधील विशेष कॅप्सूलद्वारे अतिशय वेगाने प्रवास करता येतो.

Hyperloop Track : अवघ्या अर्ध्या तासात 350 किमीचा प्रवास; देशातील पहिला हायपरलूप टेस्टिंग ट्रॅक तयार

नवीन टेक्नॉलॉजीच्या जोरावर दळवळणांची साधने देखील बदलत आहे. प्रवासासाठी कमीत कमी वेळ लागेल, अशी साधने टेक्नॉलॉजी तयार करण्यावर शासनाचा भर असतो. बदलत्या दळणवळणाच्या साधनांमध्ये बुलेट ट्रेनसोबत हायपरलूप ट्रॅकचे नावही समाविष्ट करण्यात आले आहे. 

देशातील पहिला हायपरलूप चाचणी ट्रॅक तयार करण्यात आला आहे. या हायपर लूपच्या सुरुवातीमुळे, 350 किलोमीटरचा प्रवास फक्त 30 मिनिटांत करता येईल. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनीही सोशल मीडिया साईटवर याबाबत एक पोस्ट शेअर केली आहे. 

हायपरलूपसाठीच्या 422 मीटर लांबीचा हायपरलूप टेस्ट ट्रॅक आयआयटी मद्रासच्या मदतीने तयार करण्यात आला आहे. रेल्वेमंत्र्यांनीही टेस्ट ट्रॅक पूर्ण झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. यामुळे भविष्यात वाहतूक सुलभ होईल असेही म्हटले आहे.

रेल्वेमंत्र्यांनी हायपरलूपबद्दल सोशल मीडिया पोस्ट 

"हायपरलूपला भविष्यातील तंत्रज्ञान मानले जात आहे. या तंत्रज्ञानाअंतर्गत, ट्रेन एका विशेष ट्यूबमध्ये अति वेगाने चालवता येते. येत्या काही दिवसांत ट्रेनच्या चाचण्या सुरू होतील, अशी अपेक्षा आहे. जर सर्व काही व्यवस्थित झाले आणि भारतात हायपरलूप ट्रेन सुरू झाली तर सार्वजनिक वाहतुकीची संपूर्ण रचना बदलेल", असं ट्वीट रेल्वेमंत्र्यांनी केले आहे.

Latest and Breaking News on NDTV

हायपरलूप ट्रॅक म्हणजे काय? 

हायपरलूप ही एक अत्याधुनिक वाहतूक व्यवस्था आहे, जी व्हॅक्यूम ट्यूबमधील विशेष कॅप्सूलद्वारे अतिशय वेगाने प्रवास करता येतो. 9 नोव्हेंबर 2020 रोजी अमेरिकेतील लास वेगास येथे 500 मीटर ट्रॅकवर पॉडसह व्हर्जिन हायपरलूप चाचणी घेण्यात आली. त्याचा वेग ताशी 161 किलोमीटर होता.

Latest and Breaking News on NDTV


आयआयटी मद्रासच्या डिस्कव्हरी कॅम्पसमध्ये असलेला हा चाचणी ट्रॅक भारतीय रेल्वे, आयआयटी मद्रासच्या अविष्कार हायपरलूप टीम आणि टीयूटीआर हायपरलूप स्टार्टअप यांच्या भागीदारीत बांधण्यात आला आहे. सुरुवातीला या ट्रॅकची चाचणी 100 किमी प्रतितास वेगाने करण्यात आली होती आणि येणाऱ्या चाचण्यांमध्ये त्याची चाचणी 600 किमी प्रतितास वेगाने केली जाईल. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: