Sarang Sathaye And Paula Marriage: भाडिपा या मराठी कंटेन्ट चॅनलचा संस्थापक अभिनेता सारंग साठे याने त्याची प्रेयसी पॉलासोबत २८ सप्टेंबर रोजी लग्नगाठ बांधली. गेल्या कित्येक वर्षांपासून ते एकत्र होते. दोघांनाही लग्न करायचं नव्हतं. एक कागद आमचं नातं ठरवू शकत नाही अशी भूमिका घेत दोघांनी आतापर्यंत लग्न न करता प्रेमाने एकत्र राहण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान अचानक निर्णय का बदलला यावर सारंग आणि पॉला खुलेपणाने बोलले आहेत.
भारतीय डिजिटल पार्टीच्या युट्यूब चॅनलवर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला असून यामध्ये पॉला आणि सारंग आपल्या लग्नाबद्दल बोलताना दिसत आहे. पॉला सांगते, एक वर्षभरापूर्वी तिच्यासोबत असं काही घडलं की तिने लग्न करण्याचा निर्णय घेतला. साधारण वर्षभरापूर्वी मी एकटी पॅरिसहून मुंबईला येत होते. आमचं विमान इराकच्या जवळपास होतं. मात्र अचानक विमानाने युटर्न घेतला. कुणाला काही कळत नव्हतं. त्याचवेळी पायलटने एक धक्कादायक बातमी दिली. इराणने इस्त्रायलवर मोठा हल्ला केल्याची बातमी पायटलने सांगितली. त्यामुळे आम्हाला पुढे जाता येत नव्हतं.
रशियातही युद्धपरिस्थिती असल्याने तेथून जाणं शक्य नव्हतं. त्यामुळे आम्हाला पुन्हा पॅरिसमध्ये यावं लागलं. यादरम्यान पॉला खूप घाबरली होती. तिने सारंगला एक मेसेज केला होता. काहीही झालं तर माझं तुझ्यावर प्रेम आहे... हा मेसेज पाहून सारंगही गोंधळला. त्यानंतर ती हॉटेलमध्ये गेली. सारंगशी व्हिडिओ कॉलवर बोलत होती. या प्रवासादरम्यान काहीही होऊ शकलं असतं. मी अस्वस्थ झाल्याचं पॉलाने या व्हिडिओमध्ये सांगितलं. पॉलाला रडू कोसळलं. त्या दिवशी काही घडलं आणि आपण जर सारंगला भेटू शकलो नाही तर.. त्यावेळी पॉलेने सारंगकडे आपण लग्न करायला हवं अशी इच्छा व्यक्त केली. पॉलाची स्थिती पाहता सारंगने लग्न करण्याचा निर्णय घेतला. गेल्या वर्षीचा हा किस्सा त्यांनी आपल्या युट्यूबवर शेअर केला आहे.
पॉला आणि सारंगने अत्यंत साधेपणाने लग्न केलं. यानंतर त्यांच्या टीमने ऑफिसमध्ये सारंग आणि पॉलाला सरप्राइज दिलं आणि मराठमोळ्या पद्धतीने छोटेखानी विवाह केला.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world