Roop Ki Rani Choron Ka Raja: चित्रपटसृष्टीत यश आणि अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू मानल्या जातात. मात्र, कधीकधी एखादं अपयश कलाकाराच्या मानसिकतेवर खोलवर परिणाम करून जातं. असाच काहीसा अनुभव दिवंगत अभिनेते-दिग्दर्शक सतीश कौशिक यांनी घेतला होता. १६ एप्रिल १९९३ रोजी प्रदर्शित झालेला 'रूप की रानी चोरों का राजा' हा त्या काळातील सर्वात महागडा चित्रपट होता. मात्र, बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट सपशेल ठरला आणि या धक्क्यातून सतीश कौशिक सावरू शकले नव्हते.
'रूप की रानी चोरों का राजा' हा चित्रपट १९९३ मधील सर्वात महागड्या हिंदी चित्रपटांपैकी एक मानला जात होता. यात अनिल कपूर आणि श्रीदेवी यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. मोठी स्टारकास्ट आणि प्रचंड बजेट असूनही, हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल अपयशी ठरला. या चित्रपटाचे दिग्दर्शन सतीश कौशिक यांनी केले होते आणि निर्मिती बोनी कपूर यांनी केली होती. 'जीना इसी का नाम है' या सेलिब्रिटी चॅट शो दरम्यान सतीश कौशिक यांनी खुलासा केला की, चित्रपटाच्या अपयशानंतर ते इतके खचले होते की, चित्रपट बॉक्स ऑफिसवर कशी कामगिरी करत आहे, हे बोनी कपूर यांना विचारण्याचे धाडसदेखील त्यांनी केले नाही.
एका प्रसिद्ध चॅट शोमध्ये या चित्रपटाचे निर्माते बोनी कपूर यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. चित्रपट फ्लॉप झाल्यानंतर सतीश कौशिक इतके नैराश्यात होते की, त्यांनी आत्महत्येचा विचार केला होता. बोनी कपूर यांनी सांगितले की, सतीश चालत्या कारमधून उडी मारण्याच्या तयारीत होते. इतकेच नाही तर हॉटेलवर पोहोचल्यावर पहिल्या मजल्यावरून खाली उडी मारण्याचा विचारही त्यांच्या मनात आला होता.
मात्र, सतीश कौशिक यांनी संभाषणात ही गंभीर परिस्थिती विनोदी पद्धतीने स्पष्ट केली. ते म्हणाले की, जेव्हा ते हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर उभे होते, तेव्हा खाली जेवणाची व्यवस्था केली होती. त्यांना अचानक वाटले की, जर त्यांनी खाली उडी मारून जेवणावर उडी मारली, तर लोकांना वाटेल की त्यांनी आत्महत्या करण्यासाठी नाही, तर जेवणासाठी उडी मारली आहे.
(नक्की वाचा: Bollywood News: बॉलिवूडच्या बड्या कोरिओग्राफरचं वयाच्या 15व्या वर्षी धर्मपरिवर्तन, शिवलिंगाबाबत केला खुलासा)
दरम्यान, 'रूप की रानी चोरों का राजा' या चित्रपटाची कथा प्रसिद्ध लेखक जावेद अख्तर यांनी लिहिली होती. या चित्रपटात अनुपम खेर, जॉनी लिव्हर आणि जॅकी श्रॉफ यांसारखे प्रमुख कलाकारही होते. हा चित्रपट १६ एप्रिल १९९३ रोजी प्रदर्शित झाला, परंतु बॉक्स ऑफिसवर तो अपेक्षा पूर्ण करू शकला नाही.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world