जाहिरात

'पुन्हा मुलगी होईल याची भीती, राम चरणला यावेळेस मुलगा व्हावा...' चिरंजीवींचे वादग्रस्त विधान

Chiranjeevi Controversial Statement Over Grandson : ज्येष्ठ अभिनेते चिरंजीवी यांनी एका कार्यक्रमामध्ये केलेल्या विधानामुळे नवा वाद सुरू झाला आहे.

'पुन्हा मुलगी होईल याची भीती, राम चरणला यावेळेस मुलगा व्हावा...' चिरंजीवींचे वादग्रस्त विधान

Chiranjeevi Controversial Statement Over Grandson : तेलुगू सुपरस्टार चिरंजीवी यांनी मुलींशी संबंधित केलेल्या विधानामुळे चाहते नाराज झाले आहेत. एका कार्यक्रमामध्ये चिरंजीवी यांनी नातू नसल्याची खंत जाहीररित्या व्यक्त करून दाखवली. आपला वारसा पुढे नेणारे कोणी तरी असावे, अशी भावना त्यांनी जाहीररित्या मांडली. कार्यक्रमामध्ये एका प्रश्नाचे उत्तर देताना चिरंजीवी म्हणाले की,'जेव्हा मी घरामध्ये असतो. तेव्हा मी नातवंडांनी घेरलो गेलोय असे मला वाटत नाही. तर महिलांच्या हॉस्टेलचा वॉर्डन असून मला महिलांनी घेरलंय, असे वाटते. मला (राम) चरणकडून इतकंच हवंय आणि मी त्याला सांगत असतो की किमान यावेळेस तरी मुलगा व्हावा जेणेकरून आपला वारसा पुढे वाढेल. त्यांना पुन्हा मुलगी होईल, याची मला भीती वाटते"

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा)

चिरंजीवी यांनी केलेल्या विधानाचा सर्व स्तरातून विरोध होऊ लागला आहे. एका चाहत्याने म्हटलंय की, "चिरंजीवी यांनी शब्दांचा अतिशय चुकीचा वापर केलाय. मुलांप्रमाणेच किंवा त्याहूनही चांगल्या पद्धतीने मुली वारसा पुढे नेतात. हा एक चुकीचा संदेश आहे आणि हे आपल्याला काळाच्या अधिक मागे घेऊन जात आहे. प्रत्येकजण त्यांच्या म्हणण्यावर हसत आहेत. ही कृती आपल्या चुकीच्या विचारांना दर्शवत आहे."

(नक्की वाचा: Maharashtrachi Hasyajatra: मैत्रिणीचा सल्ला ऐकणं प्रसिद्ध अभिनेत्याच्या अंगलट, थेट गर्लफ्रेंडशी घेतला पंगा)

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वरील एका पोस्टमध्ये लिहिले होते की,"गेल्या काही दिवसांपासून चिरंजीवी समाजामध्ये त्यांच्या असलेल्या प्रतिमेपासून विरुद्ध वागत आहेत. स्टेजवर अश्लील शब्द वापरणे, मुलींना वारसा न मानणे, अनैतिक संबंधांबाबत बोलणे, त्यांना कधीही भाऊ पवन कल्याणला पाठिंबा दर्शवताना पाहिले गेले नाही, पण आता ते जनसेनेला आपले म्हणत आहेत." 

एका युजरने लिहिलंय की, "चिरंजीवीची... अभिनेता म्हणून मी तुमचा सन्मान करतो. तुम्ही तुमच्या विधानावर काही स्पष्टीकरण दिले तर मला चांगले वाटेल. तुमचे विधान महिलाविरोधी वाटत होते आणि वारसा केवळ एक मुलगा किंवा पुरुषच पुढे नेऊ शकतो, असे वाटते होते. तुम्हाला खरोखर तसे सुचवायचे होते का? तुमच्या मुलाला आणि सुनेला दुसऱ्यांदादेखील मुलगी होण्याची शक्यता तुम्हाला अस्वस्थ करतेय का? किंवा ब्रह्मानंदम यांच्या चित्रपट सोहळ्यात केलेली केवळ विनोदी टिप्पणी होती ?"