बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खान याने आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देत समृद्धी आणि आनंदाचा संदेश दिला आहे. दिवाळीत शाहरुख आपल्या मित्र परिवारासाठी मन्नतवर पार्टीचं आयोजन करत असतो. ही पार्टी भव्य दिव्य असते. पण या वर्षी शाहरुखने ही पार्टी देण्याचे टाळले आहे. या वर्षी अशा पार्टीचं आयोजन त्याने केले नाही.'मन्नत' मध्ये सुरू असलेल्या नूतनीकरणाच्या (Renovation) कामामुळे कुटुंबासोबत त्याने शांतपणे हा सण साजरा केला. सध्या तो मुलगी सुहाना खान सोबत 'किंग' चित्रपटाच्या शूटिंगसह आंतरराष्ट्रीय प्रोजेक्ट्समध्ये व्यस्त आहे.
नक्की वाचा - Muslim women: मुस्लिम महिला करतायत श्रीरामाची आरती, त्या मागचे कारण ऐकून धक्का बसेल
शाहरुखने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक भावनिक संदेश लिहून चाहत्यांप्रति प्रेम व्यक्त केले. त्याने पत्नी गौरी खान दिवाळी पूजा करत असतानाचा एक फोटो शेअर केला. कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, “सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा! माँ लक्ष्मी तुम्हाला समृद्धी आणि आनंद प्रदान करो. सर्वांसाठी प्रेम, आनंद आणि शांततेची कामना करतो असं त्याने म्हटलं आहे.” या पोस्टवर चाहत्यांनी शुभेच्छा, प्रेमाचे संदेश आणि हार्ट इमोजींचा वर्षाव केला आहे.
नक्की वाचा - मुघलांच्या काळात कशी साजरी व्हायची दिवाळी? 'जश्न-ए-चिरागां'च्या नावाखाली काय व्हायचं?
शाहरुख खान सध्या आपल्या नव्या प्रोजेक्टमध्ये व्यस्त आहे. तो सध्या युरोपमध्ये 'किंग' चित्रपटाचे शूटिंग करत आहे. गेल्या आठवड्यात तो जॉय फोरममध्ये दिसला. जिथे त्याने कोरियन चित्रपट लीजेंड ली जंग-जे सह अनेक कलाकारांची भेट घेतली. 'किंग' मध्ये शाहरुख पहिल्यांदाच मुलगी सुहाना खानसोबत काम करणार आहे. या चित्रपटात दीपिका पदुकोण यांची महत्त्वाची भूमिका असेल. तसेच राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन हे कलाकारही दिसणार आहेत. 'मन्नत'चे काम पूर्ण झाल्यावर पुढच्या वर्षी ग्रँड पार्टी होण्याची शक्यता आहे.