
सध्या दिवाळीचा सण मोठ्या उत्साहात संपूर्ण देशात साजरा केला जात आहे. अयोध्या नगरीत त्रेता युगाप्रमाणे (Like Treta Yuga) भव्य दीपोत्सव साजरा होत आहे. तर दुसरीकडे काशी (Varanasi) शहरात हिंदू-मुस्लिम ऐक्याची अद्भुत उदाहरण (Wonderful Example) पाहायला मिळत आहेल. येथील हिंदू आणि मुस्लिम महिलांनी एकत्रितपणे भगवान श्रीरामचंद्रांची आरती (Shri Ram Aarti) करून दिवाळीचा (Diwali) सण साजरा केला. यावेळी आरतीसाठी आलेल्या महिलांनी स्पष्ट संदेश दिला की, राम (Ram) कोणत्याही धर्म किंवा पंथाचे नाहीत. त्यांना कोणत्या धर्मात किंवा पंथात बांधता येणार नाही. प्रभू श्री राम हे सर्वांचेच आहेत असं सांगितलं.
वाराणसीत गंगा-जमुनी तहजीबची (Shared Culture) ही दुर्मिळ झलक समोर आली. मुस्लिम आणि हिंदू महिलांनी केवळ श्रीराम आरतीच केली नाही, तर सामूहिकपणे (Collectively) हनुमान चालीसाचे (Hanuman Chalisa) पठणही केले. देशात रामराज्याची (Ram Rajya) स्थापना व्हावी, अशी मनोकामना व्यक्त केली. यावेळी उपस्थित असलेल्या मुस्लिम महिलांनी विशेषत्वाने सांगितले की, "भगवान राम हे आम्हा सर्वांचे आहेत. ते आमचे पूर्वज आहेत. त्यामुळे आम्ही त्यांची पूजा करतो." श्रद्धा आणि भक्तीला धर्माच्या सीमांमध्ये कैद (Imprison) केले जाऊ शकत नाही, असं ही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं.
नक्की वाचा - मुघलांच्या काळात कशी साजरी व्हायची दिवाळी? 'जश्न-ए-चिरागां'च्या नावाखाली काय व्हायचं?
मुस्लिम महिला फाउंडेशनचे संरक्षक डॉ. राजीव श्रीवास्तव यांनी या आयोजनाला बनारसच्या महान संस्कृतीचे उदाहरण म्हटले आहे. ते म्हणाले की, भगवान राम (Lord Ram) हे कोणत्याही एका धर्माचे किंवा संप्रदायाचे नाहीत, तर ते सर्वांचे आराध्य आहेत. प्रत्येक धर्मातील व्यक्ती आता श्रीराम आरती (Shri Ram Aarti) करून आपली श्रद्धा व्यक्त करू इच्छित आहे. काशीतील महिलांनी एकीने (Unity) केलेली ही राम आराधना, राष्ट्रीय बंधुता (National Brotherhood) आणि सद्भावाचा (Harmony) संदेश देणारी आहे.
एकीकडे हिंदू मुस्लीम वाद कसा होईल याचा प्रयत्न राजकारणी करत असतात. तर दुसरीकडे हिंदू मुस्लीम ऐक्याचे उदाहरण समोर आले आहे. वाद होण्या पेक्षा एकीनं राहीलेलं कधी चांगलं. जात धर्म काढून कुणाचंही भलं होणार नाही असाच संदेश या माध्यमातून दिला आहे. प्रत्येकाने हा संदेश आत्मसात करण्याची ही गरज या निमित्ताने व्यक्त होत आहे. दरम्यान दिवाळीचा सण सर्वत्र उत्साहात आणि आनंदात साजरा केला जात आहे. त्याची झलक वाराणसीसह उत्तर प्रदेशातील प्रत्येक शहरात पाहायला मिळत आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world