जाहिरात

मुघलांच्या काळात कशी साजरी व्हायची दिवाळी? 'जश्न-ए-चिरागां'च्या नावाखाली काय व्हायचं?

मुघल काळात दिवाळीच्या निमित्ताने आतषबाजी (Fireworks) करण्याची मोठी प्रथा होती.

मुघलांच्या काळात कशी साजरी व्हायची दिवाळी? 'जश्न-ए-चिरागां'च्या नावाखाली काय व्हायचं?
नवी दिल्ली:

Diwali During Mughal Era: भारतात दिवाळीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो.  ही परंपरा शेकडो वर्षांपूर्वीपासून चालत आलेली आहे. ज्या काळात भारतात मुघलांचे राज्य होते, तेव्हाही या सणाला विशेष महत्त्व होते. अनेक मुघल बादशाहांच्या दरबारात या उत्सवाची झलक पाहायला मिळत होती. मुघलांच्या काळात दिवाळी कशी साजरी होत असे याबाबत वेगवेगळ्या कथा आहेत. त्या काळात दिवाळीचं महत्व ओळखून मुघल बादशहा कशा पद्धतीने दिवाळी साजरी करायचे हे आपण जाणून घेणार आहोत. 

अकबराच्या दरबारात दीपोत्सव
इतिहासकारांच्या माहितीनुसार, मुघल बादशाह अकबरच्या (Akbar) दरबारात दिवाळीच्या निमित्ताने दीप (Lights) लावले जात असत. लोक नवीन कपडे परिधान करत आणि एकमेकांना मिठाई (Sweets) वाटत. अकबरच्या काळातच दिवाळीचा उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्याची सुरुवात झाली.  हीच परंपरा जहांगीर (Jahangir) आणि शाहजहाननेही (Shah Jahan) पुढे चालू ठेवली. मुघलांच्या काळात दिवाळीला 'जश्न-ए-चिरागां' असेही म्हटले जात असे. त्या भव्यता त्यावेळी जाणवायची. खऱ्या अर्थाने दिवाळीचा सण साजरा होत होता. 

नक्की वाचा - Sweets Test: सण आले, पण मिठाईत भेसळ! खरी-खोटी मिठाई घरीच ओळखण्याची जाणून घ्या सोपी पद्धत

औरंगजेबाच्या काळातील बंधने
क्रूर शासक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगजेबाला (Aurangzeb) वेगवेगळ्या समाजांनी एकत्र येऊन सण साजरे करणे आवडत नव्हते. त्यामुळे त्याच्या काळात दिवाळीचा उत्सव पूर्वीच्या इतक्या (Same extent) धुमधडाक्यात साजरा होत नसे. मात्र, या बंधनांनंतरही लोक हा सण आपापल्या घरी साजरा करत. त्यांचे घर दिव्यांनी (Lamps) प्रकाशित होत असे आणि मिठाई वाटण्याची पद्धत कायम होती.

नक्की वाचा - Crazy Cost: देशातील सर्वात महागडी मिठाई! प्रती किलो दर ऐकला तर बसेल झटका, काय खास आहे या मिठाईत?

शाही समारंभात आतषबाजी
मुघल काळात दिवाळीच्या निमित्ताने आतषबाजी (Fireworks) करण्याची मोठी प्रथा होती. मुघलांच्या राजवटीतच फटाके (Crackers) आणि आतषबाजीचा वापर मोठ्या प्रमाणावर सुरू झाला. शाही विवाह किंवा अन्य मोठ्या उत्सवांमध्येही जोरदार आतषबाजी केली जात असे, ज्यामुळे हा ट्रेंड (Trend) पुढे रूढ झाला. दिवाळीतही मोठ्या प्रमाणात  त्या काळी फटाके उडवले जात होते. आतषबाजी केली जात असे. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com