Shahrukh Khan : 'मन्नतवर या, बसूया'; वेब सीरिजच्या शूटिंगदरम्यान शाहरुख खान वारंवार कुणाला आमंत्रण द्यायचे?

अनेक अभिनेते त्यांच्या छंदांमुळे चर्चेत येतात. असाच एक अभिनेता म्हणजे बॉलिवूडचा किंग शाहरुख खान.

जाहिरात
Read Time: 2 mins

Shahrukh Khan : बॉलिवूडचे कलाकार आपल्या चित्रपटांसह खासगी आयुष्यामुळेही चर्चेत असतात. अनेक कलाकांच्या छंदाचीही खूप चर्चा होते. त्यापैकी एक किंग खान शाहरुख खान आहे. शाहरुख खान याला दारुची आवड आहे, हे आम्ही नाही तर बार्ड्स ऑफ बॉलिवूडचा अभिनेता मनोज पाहवा याच्या बोलण्यावरुन स्पष्ट होतं. मनोज पाहवा यांनी शाहरुख खानसोबतच्या त्यांच्या काळातील एक मजेदार किस्सा शेअर केला आहे. अलिकडच्या एका मुलाखतीत त्याने खुलासा केला की, शाहरुख खान द बार्ड्स ऑफ द वेब सिरीजच्या सेटवर यायचे आणि सर्वांचं खूप प्रेमाने स्वागत करायचे.

मनोज पाहवा काय म्हणाले?

मॅशेबल इंडियाशी बोलताना मनोज म्हणाले, शाहरुख सर अत्यंत प्रेमळ आहेत. ते द बार्ड्स ऑफ द वेब सिरीजच्या सेटवरही सर्वांशी आनंदाने वागायचे. ते नेहमी म्हणायचे, मन्नतला या दारु पिऊया. आर्यन खानने ही वेब सीरिड डायरेक्ट केली आहे. यामध्ये मनोज पाहवा मुख्य पात्राचे काका अवतार सिंहच्या भूमिकेत आहेत. या सीरिजमध्ये लालवानी, राघव जुयाल, बॉबी देओल, मोना सिंहसारखे अनेक कलाकार आहेत. ही सीरिजचं कथानक बॉलिवूडच्या जगात येऊ पाहणाऱ्या एका अभिनेत्याचं स्वप्न आणि आव्हानांभोवती आहे. मनोजने सांगितलं, सुरुवातीला त्यांनी ही भूमिका स्वीकारण्यास नकार दिला होता. त्यांना स्क्रिप्ट देण्यात आली नव्हती. ऑडिशनही झालं नव्हतं, शिवाय ते व्यस्त होते. मात्र आर्यनने त्यांना चार वेगवेगळ्या स्क्रिप्ट पाठवल्या आणि त्यांची मनधरणी केली.

Advertisement

नक्की वाचा - Arijit singh : अरिजीत सिंगची राजकारणात एन्ट्री; स्वत:चा पक्ष उभा करुन निवडणूक लढणार, काय आहे प्लान?

शाहरुख आणि आर्यन दोघेही मेहनती...

आम्ही सलग खूप तास शूटिंग केलं, मात्र मजा आली. मनोजने शाहरुख आणि आर्यन दोघांच्या मेहनतीचं कौतुक केलं. ते म्हणाले, शाहरुख खूप मेहनती आणि वर्कहोलिक आहे. गरज पडली तर ते १८ ते २० तास काम करताता. आर्यनमध्येही तिच खासियत आहे. मनोजने सांगितलं की, सेटवर आर्यनने त्याची काळजी घेतली. कधी-कधी त्यांना मन्नतमधूनही जेवण येत होतं.vमनोजने मालिकेच्या यशाबद्दल आनंद व्यक्त केला. तो म्हणाला, मला खूप आनंद आहे की.. हा शो इतका लोकप्रिय झाला. आम्हाला पूर्ण पैसे आणि खूप आदर मिळाला."