जाहिरात

Arijit singh : अरिजीत सिंगची राजकारणात एन्ट्री; स्वत:चा पक्ष उभा करुन निवडणूक लढणार, काय आहे प्लान?

अरिजीत सिंग पुढे काय करतीय यासंदर्भात NDTV च्या हाती मोठी बातमी लागली आहे.

Arijit singh : अरिजीत सिंगची राजकारणात एन्ट्री; स्वत:चा पक्ष उभा करुन निवडणूक लढणार, काय आहे प्लान?
Social Media

Arijit singh planning to launch a new political party : यंदाच्या पिढीतील सर्वात प्रसिद्ध पार्श्वगायकांपैकी अरिजीत सिंग याने २७ जानेवारी रोजी सोशल मीडियावर निवृत्तीची पोस्ट करीत खळबळ उडवली. यावेळी अरिजीत सिंग यांनी सांगितलं की, तो पार्श्वगायनातून ब्रेक घेत आहे. येणाऱ्या काळात ते अशा प्रकारचे कोणत्याही प्रकल्पाचा भाग होणार नाहीत. अशावेळी अनेकांना प्रश्न पडला की आता अरिजीत सिंग पुढे काय करतीत?

अरिजीत सिंग पुढे काय करतीय यासंदर्भात NDTV च्या हाती मोठी बातमी लागली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अरिजीत सिंग एक राजकीय पक्ष सुरू करण्याचा विचार करीत आहेत. अद्याप ते राजकीय पक्ष तातडीने लॉन्च करणार नाहीत आणि २०२६ च्या बंगालच्या विधानसभा निवडणुकीतही सहभागी होणार नाहीत. बंगाली चित्रपटसृष्टीच्या अंतर्गत सूत्रांनुसार, अरिजीत सुरुवातीला स्थानिक पातळीवरुन निवडणुका लढण्याचा विचार करू शकतात. 

नक्की वाचा - Arijit Singh Announces Retirement : 'मी आता थांबतोय'! अरिजित सिंगची निवृत्तीची घोषणा; चाहत्यांना मोठा धक्का

सध्या त्यांच्या राजकीय आकांक्षाचे तपशील गुप्त ठेवण्यात आले आहेत. मात्र अरिजीत सिंगच्या जवळच्या सूत्रांनी सांगितलं की, त्यांनी राजकीय कारकीर्द घडविण्याची प्रक्रिया आधीच सुरू केली आहे. पुढे काय होतं आणि शेवटी अरिजीत कोणता मार्ग निवडतो हे भविष्यातच कळेल.

अरिजीत सिंगची व्हायरल पोस्ट...

प्रसिद्ध आणि लोकप्रिय गायक अरिजित सिंगने सोशल मीडियावर पोस्ट करीत निवृत्तीची घोषणा केली आहे. अरिजित सिंगने जाहीर केलं की तो आता चित्रपटांसाठी पार्श्वगायन करणार नाही. निवृत्तीची घोषणा करताना अरिजितने स्पष्ट केलं की, तो चित्रपटांसाठी गाणार नसला तरी 'संगीत निर्मिती' (Making Music) मात्र थांबवणार नाही. तो स्वतंत्र संगीत, अल्बम्स आणि स्वतःच्या गाण्यांवर लक्ष केंद्रित करणार आहे. अरिजितने सांगितलं की, त्याला आता स्वतःच्या सर्जनशीलतेला अधिक वेळ द्यायचा आहे आणि नव्या प्रकारच्या संगीताचा शोध घ्यायचा आहे. बॉलीवूडच्या ठराविक साच्यातील गाण्यांपेक्षा त्याला मुक्तपणे काम करायची इच्छा आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com