संपूर्ण जग फिरलेला सुपरस्टार शाहरुख खान काश्मीरमध्ये का जात नव्हता? स्वत:चं सांगितलं कारण, Video

Shah Rukh Khan : शाहरुख खानसारख्या सुपरस्टारसाठी जगभरात कुठंही जाणं अशक्य नाही. पण, शाहरुख काश्मीरमध्ये जाणं टाळत होता

जाहिरात
Read Time: 2 mins
Shah rukh Khan had never gone Kashmir: शाहरुख खान काश्मीरमध्ये जाणे का टाळत असे?
मुंबई:

चित्रपट अभिनेता शाहरुख खान (Shah Rukh Khan) हा बॉलिवूडमधील सर्वाधिक यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. त्याला सुपपस्टारचा दर्जा आहे. चित्रपटासह क्रिकेट आणि अन्य व्यवसायातही शाहरुखनं मोठं यश मिळवलंय. तो चित्रपटाचं शूटिंग तसंच अन्य कारणांमुळे जगभर फिरलाय. शाहरुख खानसारख्या सुपरस्टारसाठी जगभरात कुठंही जाणं अशक्य नाही. पण, शाहरुख काश्मीरमध्ये जाणं टाळत होता. चित्रपटात यशस्वी झाल्यानंतरही तो भारताचं नंदनवन समजल्या जाणाऱ्या या प्रदेशात गेलाच नव्हता. याचं कारण तुम्हाला माहिती आहे का?

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा अनेक कलाकारांनी निषेध केलाय. शाहरुख खानंनंही X वर त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. 'पहलगाममध्ये झालेला हिंसाचार आणि अमानवी कृत्यामुळे झालेलं दु:ख शब्दात व्यक्त करता येणार नाही. या काळात तुम्बही फक्त परमेश्वराचे नामस्मरण करु शकता आणि पीडितांच्या कुटुंबीयांसाठी प्रार्थना करु शकता,' असं शाहरुखनं लिहलं आहे. पण, शाहरुख खान स्वत: 2012 पर्यंत कधीही काश्मीरमध्ये गेला नव्हता. स्वत: शाहरुखनंच याचं कारण सांगितलं होतं.

'कौन बनेगा करोडपती' या लोकप्रिय कार्यक्रमात चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहरुख खान सहभागी झाला होता. त्यामध्ये शाहरुखनं त्याच्या वडिलांनी मृत्यूपूर्वी व्यक्त केलेली इच्छा सांगितली. त्यावेळी तो फक्त 15 वर्षांचा होता.

( नक्की वाचा : Fact Check : शाहरुख खानच्या बायकोनं इस्लाम धर्म स्वीकारला? Viral फोटोचं सत्य काय? )
 

शाहरुख म्हणाला, 'माझ्या वडिलांची आई काश्मिरी होती. त्यांनी मला सांगितलं की या जगातील तीन जागा अशा आहेत की त्या आयुष्यात नक्की पाहिल्या पाहिजेत. इस्तंबूल, इटली आणि काश्मीर. त्यामधील पहिल्या दोन तू माझ्याशिवाय पाहू शकतोस. पण, काश्मीर माझ्याशिवाय पाहू नकोस. 

मला काश्मीरला जाण्याची संधी अनेकदा मिळाली होती. मित्रांनी कुटुंबासोबत सुट्टी घालवण्यासाठी आमंत्रण दिलं होतं. पण, मी कधीही काश्मीरला गेलो नाही. कारण, मला वडिलांनी सांगितलं होतं की, मी काश्मीर दाखवेन.'

Advertisement

शाहरुख काश्मीरमध्ये कधी गेला?

चित्रपट निर्माते यश चोप्रा हे शाहरुखसाठी पित्यासमान होते. ते शाहरुखला 'जब तक है जान' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी  काश्मीरमध्ये घेऊन गेले होते. शाहरुखनं 2012 साली काश्मीरमध्ये पहिल्यांदा पाऊल ठेवलं. त्यावेळी शाहरुखनं ट्विटरवर लिहिलं होतं., 'मला काश्मीरला नेण्याची वडिलांची इच्छा अपूर्ण राहिली. पण, मी आता काश्मीरमध्ये आहे. मला असं वाटतंय की मी त्यांच्या मजबूत मिठीमध्ये आहे.' 

त्यापूर्वी शाहरुखनं 'दिल से ' या सिनेमासाठी लड्डाखमध्ये शूटिंग केलं होतं. पण, तो कधीही काश्मीरमध्ये गेलो नव्हता. त्यानंतर 2023 साली तो पुन्हा काश्मीरमध्ये गेला. त्यावेळी राजकुमार हिरानी यांच्या डंकी चित्रपटाचं सोनमर्गमध्ये होणाऱ्या शूटिंगसाठी तो काश्मीरमध्ये गेला होता.'
 

Advertisement
Topics mentioned in this article