Mannat Bungalow : शाहरुख खानचं मोठं टेन्शन गेलं; बॉलिवूडच्या बादशहाचा 'मन्नत' बंगला घेणार उंच भरारी

सुपरस्टार शाहरुख खान याचा मन्नत बंगला काही महिन्यांपूर्वी अडचणीत सापडला होता. अखेर त्यावरील सर्व संकट दूर झाली आहेत.

जाहिरात
Read Time: 2 mins

Shah Rukh Khan's Mannat Bungalow CRZ : सुपरस्टार शाहरुख खान याचा मन्नत बंगला काही महिन्यांपूर्वी अडचणीत सापडला होता. शाहरुखच्या बंगल्याच्या बांधकामात सीआरझेड नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याची तक्रार पालिकेकडे करण्यात आली होती. दरम्यान मन्नतवरील टेन्शन अखेर संपलं आहे. शाहरुख खानच्या वांद्रेतील बंगल्याच्या विस्ताराला सीआरझेड म्हणजेच महाराष्ट्र किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरणाने १९४ व्या बैठकीत हिरवा झेंडा दाखवला आहे. रमझानच्या पवित्र्य महिन्यात शाहरुख खानच्या मन्नतचा रस्ता मोकळा झाला आहे.

मन्नतच्या बांधकामाचा मार्ग अधिकृतपणे मोकळा...

शाहरुख खानच्या मन्नत या बंगल्याच्या बांधकामावर एकाने नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी आक्षेप घेतला होता. शाहरुखच्या बंगल्याच्या बांधकामावेळी सीआरझेडच्या नियमांचं उल्लंघन करण्यात आल्याची तक्रार करण्यात आली होती. सीआरझेडकडून हिरवा कंदील मिळाल्यामुळे मन्नतच्या वाढीव बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे मन्नतला आता नव्या उंचीची भर पडणार आहे. सध्या या बंगल्याच्या परिसरात दोन तळमजले, पहिल्या ते सहाव्या मजल्यापर्यंत निवासी रचना आहे.

Advertisement

नक्की वाचा - Nehha Pendse : 'मी एग्ज फ्रीज केले होते, पण आता...'; मराठीतील बोल्ड अभिनेत्रीच्या Bold विधानाने चाहते संतापले

सुमारे २४४६.४० चौरस मीटर क्षेत्रफळ असलेल्या या भूखंडावर एकूण बांधकाम ४५५३.४४ चौरस मीटरपर्यंत वाढणार आहे. त्यापैकी एफएसआय क्षेत्र ३०२९.२० चौरस मीटर असून उर्वरित भाग नॉन-एफएसआय स्वरुपात आहे. नव्या सुधारणेमुळे जवळपास ५९६ चौरस मीटर अतिरिक्त बांधकाम करता येणार आहे. या परिसरात कोणताही वारसा वास्तू नसल्याचं सांगितलं असून हमीपत्र सादर करण्याची सूचनाही देण्यात आली आहे. लोकमतने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.