शत्रुघ्न सिन्हा धर्मेंद्रंच्या दोन्ही कुटुंबीयांच्या भेटीला,भावुक पोस्ट शेअर करत सांगितलं कसे होते भेटीचे क्षण

Dharmendra: धर्मेंद्र यांच्या निधनानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी त्यांच्या दोन्ही कुटुंबीयांची भेट घेतली.

जाहिरात
Read Time: 2 mins
"Dharmendra: धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनींनी शत्रुघ्न सिन्हांची घेतली भेट"
Shatrughan Sinha X
वाचा
Summary is AI-generated, newsroom-reviewed
  • शत्रुघ्न सिन्हा यांची धर्मेंद्र यांच्या भावुक पोस्ट
  • शत्रुघ्न सिन्हा यांनी धर्मेंद्र यांच्या पत्नी हेमा मालिनी आणि मुलींची भेट घेतली
  • सनी देओल आणि बॉबी देओल यांची भेट घेतल्यावर शत्रुघ्न सिन्हा यांनी धर्मेंद्र यांच्या आठवणींना दिला उजाळा
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.

Dharmendra: सुपरस्टार धर्मेंद्र यांचे 24 नोव्हेंबर यांचे निधन झालं. ही-मॅन यांचे अतिशय जवळचे मित्र शत्रुघ्न सिन्हा यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. दिल्लीहून मुंबईत परतल्यानंतर शत्रुघ्न सिन्हा यांनी धर्मेंद्र यांच्या दोन्ही कुटुंबीयांची भेट घेऊन सोशल मीडियावर भावुक पोस्ट शेअर केलीय. याद्वारे त्यांनी काही खास फोटो शेअर करून धर्मेंद्र यांच्या आठवणींनाही उजाळा दिला. 

शत्रुघ्न सिन्हा यांनी हेमा मालिनी आणि त्यांच्या मुलींची भेट घेतली 

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट शेअर करत शत्रुघ्न सिन्हा यांनी लिहिलं की, आमची प्रिय मैत्रीण हेमा मालिनी यांना भेटलो. आमचा मोठा भाऊ धरमजी यांना गमावण्याच्या या दुःखद वेळी त्यांना भेटणे अतिशय वेदनादायी होते. धर्मेंद्र यांच्या दोन मुली ईशा आणि अहाना यांची भेट घेऊन झालेल्या नुकसानाबाबत त्यांचे सांत्वन केलं. धरमजी एक दयाळू आणि प्रामाणिक व्यक्ती होते. ते आता आपल्यात नाहीत, पण त्यांच्या आठवणी कायमच आपल्यासोबत राहतील. या कठीण काळात त्यांच्या शांतीसाठी प्रार्थना आणि सहवेदना. देव या सर्वांवर कृपा करो. शांती.

(नक्की वाचा: Dharmendra News: धर्मेंद्र यांचे अंतिम दर्शन का देण्यात आले नाही? थरथरत्या आवाजात हेमा मालिनींनी सांगितलं...)

सनी देओल आणि बॉबी देओल यांना भेटले शत्रुघ्न सिन्हा 

शत्रुघ्न सिन्हा यांनी बॉबी देओल आणि सनी देओल यांचीही भेट घेतल्यानंतर सोशल मीडियावर पोस्ट शेअर केली होती. दिल्लीहून परतल्यानंतर अतिशय जड अंत:करणाने आमचे सर्वात प्रिय मित्र, आमचे मोठे भाऊ धर्मेंद्रजी यांच्या घरी गेलो होतो. सनी देओल आणि बॉबी देओलची भेट घेतली. धर्मेंद्रजींच्या आठवणींना उजाळा देताना वाटलं की ते किती शानदार माणूस होते. ते नेहमीच आपल्या हृदयात जिवंत राहतील. या दुःखाच्या वेळी मी संपूर्ण कुटुंबाला शांती आणि शक्ती मिळो, अशी प्रार्थना करतो.

Advertisement

(नक्की वाचा: Dharmendra News: नवस, प्रार्थना, अश्रू... धर्मेंद्र यांच्या निधनानंतर सलमान खानची पहिली प्रतिक्रिया, भाईजानला भावना अनावर)

सुपरस्टार धर्मेंद्र यांचे 24 नोव्हेंबर रोजी निधन झाले. यानंतर 27 नोव्हेंबर रोजी देओल कुटुंबानं त्यांच्यासाठी प्रार्थना सभेचे आयोजन केले होते, ज्यामध्ये शाहरुख खान, सलमान खान, रेखा यासह सिनेसृष्टीतील कित्येक कलाकार सहभागी झाले होते. तर हेमा मालिनी आणि त्यांच्या मुलींनी वेगळी शोकसभा आयोजित केली होती.

Advertisement