जाहिरात

Shefali Jariwala ग्लूटाथिओन घेत होती, सौंदर्य वाढविण्याच्या औषधांच्या Heavy Dose ने घेतला जीव?

शेफाली अँटी एजिंगसंदर्भातील औषधं घेत होती. ज्यामध्ये विटॅमिन सी आणि ग्लूटाथिओनचा वापर केला जातो. याचा उपयोग सर्वसाधारपणे त्वचा उजळ करण्यासाठी आणि डिटॉक्सीफिकेशनसाठी केला जातो.

Shefali Jariwala ग्लूटाथिओन घेत होती, सौंदर्य वाढविण्याच्या औषधांच्या Heavy Dose ने घेतला जीव?

Shefali Jariwala Death Cause Glutathione : अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचा वयाच्या 42 व्या वर्षी कार्डिअॅक अरेस्ट (Shefali Jariwala Cardiac Arrest) झाल्याने मृत्यू झाला आहे. तिच्या सुरक्षा रक्षकाने दिलेल्या माहितीनुसार, शेफालीला रात्री 10.30 वाजता रुग्णालयात नेण्यात आलं. रुग्णालयात पोहोचताच तिला मृत घोषित करण्यात आलं. तिच्या मृत्यूमागे कार्डिअॅक अरेस्ट (Shefali Jariwala Death) असल्याचं सांगितलं जात आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, शेफाली जरीवाला विटॅमिन सी आणि ग्लूटाथिओन घेत होती. अभिनेत्री अँटी एजिंगसंदर्भातील औषधं घेत होती. ज्यामध्ये विटॅमिन सी आणि ग्लूटाथिओनचा वापर केला जातो. याचा उपयोग सर्वसाधारपणे त्वचा उजळ करण्यासाठी आणि डिटॉक्सीफिकेशनसाठी केला जातो.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जरीवालाने शुक्रवारी रात्री आपली औषधं घेतली होती. दुपारी तिने अँटी एजिंगचं इंजेक्शन घेतलं होतं. यानंतर तिचा रक्तदाब कमी झाला आणि तिला थंडी वाजू लागली. यानंतर कुटुंबीयांनी तिला तातडीने रुग्णालयात हलवलं.

Shefali Jariwala : सौंदर्याने घात केला? गेल्या सात वर्षांपासून शेफाली घेत होती ही इंजेक्शन; पोलिसांच्या तपासात मोठ्या बाबी उघड

नक्की वाचा - Shefali Jariwala : सौंदर्याने घात केला? गेल्या सात वर्षांपासून शेफाली घेत होती ही इंजेक्शन; पोलिसांच्या तपासात मोठ्या बाबी उघड

ग्लूटाथिओनच्या अतिरिक्त डोसमुळे तिला त्रास झाल्याची शक्यता व्यक्त केली ( (Shefali Jariwala Death) ) जात आहे. दरम्यान ग्लूटाथिओन काय आहे आणि याचा वापर कशासाठी केला जातो, हे जाणून घेऊया.  

ग्लूटाथिओन काय आहे?  (What Is Glutathione)

  • ग्लूटाथिओनच्या अँटिऑक्सिडंट गुणधर्मांमुळे अँटीमेलोजेनिकवर परिणाम होतो.
  • हे केवळ त्वचेतील रंगद्रव्य कमी करत नाही तर सुरकुत्या कमी करण्यास आणि त्वचेचा घट्टपणा राखण्यास देखील मदत करते.
  • मेलेनिनच्या निर्मितीमध्ये त्याची महत्त्वाची भूमिका आहे. (मेलेनिनची निर्मिती कमी झाल्यामुळे चेहऱ्यावरील गोरेपणा वाढतो)
  • ते टायरोसिनेज एंझाइमला ब्लॉक करून त्वचेचा रंग संतुलित करते.

ग्लूटाथिओनचे फायदे

  • सोरायसिस उपचारादरम्यान मदत 
  • सोरायसिस आणि इतर त्वचेच्या संसर्गावर उपचार करण्यासाठी ग्लूटाथिओन खूप प्रभावी आहे. यामुळे चेहऱ्यावरील सूज कमी करण्यास मदत होते. ज्यामुळे त्वचा अधिक हेल्दी आणि तरुण दिसते. 

काळे डाग दूर होतात...

ग्लूटाथिओन जबदरस्त अँटीऑक्सिंडेट असल्याकारणाने प्रदूषण, तणाव आणि वय वाढण्याच्या प्रक्रियेत चेहऱ्यावर येणारे काळे डाग आणि त्वचेच्या इतर समस्यांना दूर करतं. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिकपणे चमकपणा येतो. 

कोलेजन म्हणजे काय?  (What Is Collagen)

  • कोलेजन हे एक विशेष प्रकारचं प्रोटीन आहे जे तुमच्या शरीराला ताकद आणि लवचिकता देण्याचे काम करते.
  • ते तुमच्या त्वचेत, हाडांमध्ये, स्नायूंमध्ये आढळते.
  • यामुळे तुमची त्वचा स्वस्थ राहते. हाडांची ताकद वाढते. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com