- शेफाली जरीवाला का 27 जून को हार्ट अटैक से निधन हुआ, उम्र 42 वर्ष थी.
- उन्होंने दो शादियां कीं, पहली शादी में घरेलू हिंसा का शिकार हुईं.
- दूसरी शादी में मां बनने का सपना अधूरा रह गया, मेडिकल दिक्कतें रहीं.
- उनकी पहली शादी 2004 में हरमीत सिंह से हुई, जिसे उन्होंने टॉर्चर बताया.
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा' या रीमिक्स गाण्याद्वारे कोट्यवधी प्रेक्षकांना वेड लावणारी अभिनेत्री शेफाली जरीवालाने जगाचा निरोप घेतलाय. वय अवघं 42 वर्षे, दोन वेळा लग्न आणि आई होण्याचे स्वप्न अपूर्णच. पण आता सारं काही संपलंय, जे काही बाकी आहे त्या फक्त तिच्या आठवणी. शेफाली जरीवाला जी ग्लॅमर वर्लमधील चमकता तारा होती. पण खासगी आयुष्यामध्ये वेगळाच संघर्ष सुरू होता. 27 जून रोजी शेफालीने जीवनाच्या पडद्यावरुन कायमची एक्झिट घेतली.
शेफाली जरीवाला पहिला पती कोण होता?
'कांटा लगा' गाण्यानंतर 'बिग बॉस 13' रिअॅलिटी शोमध्ये ती दिसली, पण या सर्व गोष्टींमागे लपली होती एका तरुणीच्या विस्कळीत झालेल्या आयुष्याची कहाणी. जी कधीच लोकांसमोर आली नाही. शेफालीचे पहिले लग्न 2004मध्ये मीत ब्रदर्स या गायक असलेल्या भावांच्या जोडीतील गायक हरमीत सिंगसोबत झाले होते. सुरुवातील सर्वकाही ठीक सुरू होते, पण पाच वर्षांनंतर चित्र बदललं. एका मुलाखतीत शेफालीने सांगितलं होते की, माझे पहिलं लग्न... माझ्यासाठी टॉर्चर होते. ते नाते मला आतून पोखरत होते.
पराग त्यागी आणि शेफाली जरीवालाने लग्न कधी केले?
पहिल्या पतीवर तिने घरगुती हिंसाचार आणि मानसिक छळाचा आरोप केला होता. त्याच्याविरोधात FIR देखील दाखल केली होती. 2014मध्ये शेफालीने पराग त्यागीसोबत लग्न केले, पण हे लग्न देखील सहजासहजी झालेले नाही. दोन वेळा लग्नाच्या तारखा ठरल्या, काही कारणास्तव लग्न होऊ शकले नाही. अखेर दोघांनी घरातच रजिस्टर्ड मॅरेज केले, या क्षणाचा साक्षीदार एकच होता तो म्हणजे त्यांचा पाळीव प्राणी.
शेफाली जरीवालाची ही इच्छा अपूर्णच...
या लग्नानंतर शेफालीच्या जीवनात एक वेगळाच संघर्ष सुरू झाला, तो म्हणजे आई होण्याचा. वयातील अंतर, वैद्यकीय समस्या आणि कायदेशीर गुंतागुंत या सर्व कारणांमुळे शेफालीचे आई होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकले नाही. कोव्हिडदरम्यान जवळच्या लोकांना गमावल्यानंतर तिने बाळाची इच्छा सोडून दिली.
शेफाली जरीवालाचा हा भूतकाळ माहितीये?
आता शेफाली हयात नाही. तिच्या निधनानंतर पतीसह आईवडिलांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय. पण तुम्हाला माहितीये हरमीत आणि परागपूर्वी देखील शेफालीच्या आयुष्यात कोणीतरी होते. त्या व्यक्तीचे नाव आहे सिद्धार्थ शुक्ला... शेफालीने सांगितले होते की सिद्धार्थ आणि ती इयत्ता अकरावीमध्ये रिलेशनशिपमध्ये होते. हरमीत आणि परागला सुद्धा तिच्या भूतकाळाबाबत माहिती होती.
एकेकाळी शेफाली जरीवालाची एकूण संपत्ती 7.5 कोटी रुपयांपेक्षा जास्त होती. सोशल मीडियावर ती कायम सक्रिय राहत असे, वेगवेगळ्या ब्रँड्ससाठी तिने काम केलंय आणि आर्थिकदृष्ट्या शेफाली सक्षम होती. पण पैसा म्हणजेच सारं काही नसते. शेफाली हे जग सोडून गेलीय, कित्येक प्रश्न अनुत्तरितच आहेत. एका महिलेच्या हसऱ्या चेहऱ्यामागे लपलेल्या वेदना कोणाला कधीतरी कळतील का?
एका लग्नामुळे शेफाली कोलमडली होती, दुसऱ्या लग्नामध्ये आई होण्याचे स्वप्न अपूर्णच राहिले आणि जेव्हा आयुष्य मनमोकळेपणाने जगायचं असं ठरवलं तेव्हा मृत्यूने कवटाळलं.