अभिनेत्री शेफाली जरीवाला हिचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. ही बातमी ऐकून तिच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का बस होता. तिच्या चाहत्यां बरोबरच बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनीही तिच्या निधनावर दुःख व्यक्त केले होते. शेफालीच्या अंत्यसंस्काराचे फोटो आणि व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. तिचे पती पराग त्यागी हे देखील खूप खचलेले दिसले. शेफालीच्या निधनावर राखी सावंतचा एक व्हिडिओ समोर आला आहे. त्यामध्ये तिने मुलींना एक खास आवाहन केले आहे. शिवाय ती शेफालीच्या निधनानंतर घाबरलेली दिसली आहे. त्यामागचं कारण ही समोर आलं आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
राखी सावंत हिने नुकताच एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये तिने मुलींना एक खास आवाहन केले आहे. ती त्या व्हिडीओत म्हणते की, मुलींनी स्वतःला उपाशी ठेवू नये. आरोग्याला प्राधान्य द्यावे. भूक लागल्यावर खावे, पण जिम करणेही आवश्यक आहे. "मला थोडीही भूक लागली तर मी लगेच जेवून घेते, कारण कधीही बीपी कमी किंवा जास्त होऊ नये," असे तिने या व्हिडीओत सांगितले आहे. राखी पुढे सांगते की बॉडी शेमिंग बंद करण्याची गरज असल्याचं ही ती म्हणाले.
राखी सावंतने व्हिडिओ शेअर करत शेफाली जरीवाला हिला श्रद्धांजली वाहिली आहे. ती पुढे म्हणते की , "मी खूप घाबरले आहे. शेफाली, आय मिस यू.", "मला कळले की शेफालीचा बीपी कमी झाला होता. तिने काही खाल्ले नव्हते. बॉलिवूडमध्ये सुंदर दिसण्यासाठी आपल्याला काय काय करावे लागते! मी तर आयुष्यभर उपाशी राहिले आहे, पण आता मी सगळं खायला सुरुवात केली आहे. जर मी जाडी दिसले तर सहन करा. मला जाडी आहे असे म्हणू नका." असं ही ती या व्हिडीओत सांगते.
राखी सावंत हीचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. प्रत्येक व्यक्तीचे शरीर वेगळे असते. हार्मोन्स वेगळे असतात. त्यामुळे कोणालाही त्याच्या शरीराच्या आकारावरून लाजवू नये. "शेफालीसोबत जे घडले, त्यानंतर मी अधिक सतर्क झाले आहे, कारण मी एकटी राहते. असं ही ती या व्हिडीओत सर्वात शेवटी म्हणते. काटा लगा गर्ल म्हणून ओळख असलेल्या शेफाली जरीवाला हीचा काही दिवसापूर्वी मृत्यू झाला होता. तिच्या मृत्यूचे कारण अजून समोर आलेले नाही.