Dharmendra Special: हिंदी चित्रपटसृष्टीत धर्मेंद्रचं मोठं योगदान राहिलं आहे. रफ-टफ बॉडी आणि हँडसम लुकमुळे धर्मेंद्र अभिनेत्रींमधील आवडता हिरो होता. धर्मेंद्र स्वभावानेही खट्याळ होता असं म्हणातात. धर्मेंद्रचा जन्म ८ डिसेंबर १९३५ रोजी पंजाबमधील एका छोट्याशा गावात झाला होता. जितकं रंजक त्याचं चित्रपटातील आयुष्य होतं तितकच रंजक त्याचं खासगी आयुष्यही होतं. आज तुम्हाला 'शोले' या चित्रपटादरम्यान हेमा मालिनी आणि धर्मेंद्रमध्ये घडलेला मजेशीर किस्सा सांगणार आहोत.
हॉटेलमधील तो फोटो व्हायरल...
चित्रपटक्षेत्रात येण्यापूर्वीच कुटुंबीयांनी धर्मेंद्रचं लग्न लावुन दिलं होतं. त्याची पहिली पत्नी प्रकाश कौर आहे. जिच्याकडून धर्मेंद्रला चार मुलं झाली. सनी देओल, बॉबी देओल, अजीता देओल आणि विजेता देओल ही चार मुलं धर्मेंद्रला पहिल्या पत्नीपासून झाली. पहिल्यांदा जेव्हा धर्मेंद्रने अभिनेत्री हेमा मालिनीला पाहिलं तर तिच्या सौंदर्याने धर्मेंद्र घायाळ झाला. दोघांनी अनेक चित्रपट एकत्र केली आहेत. काम करीत असताना दोघे जवळ आले आणि त्यांच्या अफेअरच्या चर्चा रंगू लागल्या. यादरम्यान धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांच्या एका बोल्ड फोटोने आगीत तूप ओतण्याचं काम केलं. हा फोटो एका हॉटेलचं असल्याचं सांगितलं जातं.
हेमा मालिनी आणि धर्मेंद्र दोघेही चेन्नईमध्ये शोलेचं शूटिंग करीत होते. एका फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये शोले चित्रपटाची संपूर्ण टीम थांबली होती. चित्रपट दिग्दर्शकांना जेव्हा धर्मेंद्र आणि हेमा मालिनी दिसले नाही तर ते त्यांच्या रुमजवळ गेले आणि दार न ठोठावता थेट खोलीत शिरले. यावेळी खोलीत धर्मेंद्र आणि हेमा मालिनी एका चादरीत गुंडालेल्या अवस्थेत होते. दिग्दर्शकाला अचानक पाहून दोघेही घाबरुन गेले. त्यानंतर दिग्दर्शकाने आठवण म्हणून दोघांसोबतचा एक फोटो क्लिक केला. जो फोटो नंतर लिक झाला. मनी कंट्रोल हिंदीने यासंदर्भातील वृत्त प्रसिद्ध केलं आहे.
१९७९ मध्ये धर्मेंद्रने हेमा मालिनीशी लग्न केलं. यानंतर त्यांनी पहिली पत्नी प्रकाश कौरला घटस्फोट देत सोडून दिलं नाही. धर्मेंद्र आपल्या दोन्ही पत्नी आणि सहा मुलांसोहत आनंददायी जीवन जगले.