Juinagar Railway Station : मुंबईतील रेल्वे स्टेशनवरील गर्दी नेहमीच चर्चेचा विषय असते. मुंबईतील रेल्वे स्टेशनवर पाय ठेवायला जागा नसते, असं सर्रास म्हटलं जातं. मात्र एका रेल्वे स्टेशनवर बॉलिवूडच्या तीन प्रसिद्ध गाण्यांच शुटिंग झालं आहे. आता ते स्टेशन कोणतं आणि ती गाणी कोणती हे पटकन तुम्हाला सांगता येणार नाही.
मुंबईला नवी मुंबईशी जोडणाऱ्या हार्बर लाईनवरील जुईनगर रेल्वे स्टेशनवर बॉलिवूडच्या तीन गाण्यांचं शूटिंग झालं आहे. 'ये दिल आशिकाना' या सिनेमातील टायटल साँग देखील जुईनगर रेल्वे स्टेशनवर शूट झालं आहे.
अक्षय कुमारच्या 'अफलातून' सिनेमातील 'पोस्टर लगवादो बाजार में...' हे गाणं जुईनगर रेल्वे स्टेशनवर शूट झालं आहे.
याशिवाय 'सनम तेरी कसम' सिनेमातीत 'खिंच मेरी फोटो...' हे गाणं देखील जुईनगर रेल्वे स्टेशनवर शूट झालं आहे.
सलमान खानच्या वॉन्टेड सिनेमातील एक सीन देखील जुईनगर रेल्वे स्टेशनवर शूट झाला आहे. मात्र जुईनगर आणि सानपाडा या दोन स्टेशनमध्ये अनेकांचा संभ्रम आहे. काही वर्षांपूर्वी हार्बर रेल्वेवरील स्टेशनवर सिनेमांच्या शूटिंग व्हायच्या. मात्र आता तशी स्थिती राहिलेली नाही. अनेकांनी व्हिडीओवर कमेंटकरुन रेल्वे स्टेशनच्या दुरावस्थेबद्दल तक्रार केली आहेत