
प्रशांत सिसोदिया
Sitaare Zameen Par Movie Review: आज 20 जून आहे आणि आमीर खानचा बहुप्रतीक्षित चित्रपट ‘सितारे जमीन पर' प्रदर्शित झाला आहे. (Is Sitaare Zameen Par good?) मी हा चित्रपट पाहिला आणि तो पाहिल्यानंतर मला हेच जाणवले की, सिनेमाचा खरा खेळाडू आमीर खानच आहे. तो का, हे मी तुम्हाला पुढे सांगेन. मात्र हा चित्रपट ज्यांनी मोठ्या पडद्यावर आणण्यासाठी प्रयत्न केले त्यांच्याबद्दल थोडं जाणून घेऊया आणि सोबतच या चित्रपटामध्ये मला जाणवलेल्या उणीवा कोणत्या होत्या ते देखील पाहूयात.
(नक्की वाचा: प्रभाससोबत 'स्पिरिट'मध्ये झळकणार 'हा' मराठी स्टार; संदीप वांगा रेड्डीसोबत फोटो केला शेअर)
'सितारे जमीन पर'मध्ये कोण आहेत मुख्य कलाकार? (Who is the cast of Sitaare Zameen Par?)
या चित्रपटाचे दिग्दर्शक आर. प्रसन्ना आहेत (Sitaare Zameen Par director name) आणि चित्रपटाची कथा दिव्या निधी शर्मा यांनी लिहिली आहे, शंकर-एहसान-लॉय यांनी गाण्यांना चाल लावली आहे तर राम संपत यांनी पार्श्वसंगीत दिले आहे. मुख्य कलाकार आहेत: आमीर खान, जेनेलिया डिसूझा, बृजेन्द्र काला, डॉली अहलुवालिया, गुरपाल सिंह. यासोबतच चित्रपटामध्ये 10 छान कलाकारही आहेत, ज्यांची नावे आहेत आरुष दत्ता (सतबीर), गोपी कृष्णन वर्मा (गुड्डू), वेदांत शर्मा (बंटू), नमन मिश्रा (हरगोविंद), ऋषी शाहानी (शर्माजी), ऋषभ जैन (राजू), आशीष पेंडसे (सुनील गुप्ता), सम्वित देसाई (करीम कुरेशी), सिमरन मंगेशकर (गोलू खान), आयुष भंसाली (लोटस).
(नक्की वाचा : मुकुल देवनं मृत्यूपूर्वी 4-5 दिवस सोडलं होतं जेवण)
'सितारे जमीन पर' चित्रपटाची कथा काय आहे? (Sitaare Zameen Par plot summary?)
ही कथा एका हट्टी, जिद्दी आणि वैफल्यग्रस्त ज्युनियर बास्केटबॉल प्रशिक्षकाची आहे. या प्रशिक्षकाने त्याच्या वरिष्ठ प्रशिक्षकाला कानाखाली मारलेली असते ज्यामुळे त्याला निलंबित करण्यात आलेले असते. वैफल्याने ग्रासलेला हा प्रशिक्षक नशेच्या आहारी जातो आणि त्यातून त्याच्या हातून एक अपघात होतो. त्याला शिक्षा म्हणून डाऊन सिंड्रोम असलेल्या मुलांना 3 महिने बास्केटबॉलचे प्रशिक्षण देण्याची शिक्षा दिली जाते. त्यानंतर काय काय घडते, हे तुम्हाला चित्रपटागृहात जाऊनच पाहायला हवे.
(नक्की वाचा:फक्त 1.3 सेकंदाच्या अंतरानं वाचला होता सुपरस्टारचा जीव! )
'सितारे जमीन पर' का पाहावा? (Should I watch Sitaare Zameen Par?)
ही केवळ एक कथा असून या मुख्यकथेभोवती अनेक कथा गुंफण्यात आल्या आहेत. ‘सितारे जमीन पर' हा असा चित्रपट आहे, ज्याबद्दल ओटीटीच्या काळात काही लोक म्हणू शकतात की, तो थेट डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित करायला हवा होता, किंवा कदाचित कथा ऐकल्यावर काही लोकांना वाटले असेल की, चित्रपटगृहांमध्ये फक्त मोठ्या कलाकारांचे मसाला एंटरटेनरच चालतात. पण आमीर खानने आपल्या जवळपास चार दशकांच्या कारकिर्दीत अनेक वेळा चित्रपटाचे जाणकार, ट्रेंड्स, व्यावसायिक दबाव आणि चाकोरीबद्ध विचार करणाऱ्यांना खोटे ठरवले आहे. यावेळीही तो आपल्या प्रयत्नात बराच यशस्वी झाला आहे. या चित्रपटाचा मुख्य खेळाडू आमीर खान हाच आहे. ‘सितारे जमीन पर' स्पॅनिश चित्रपट ‘चॅम्पियन्स'ची कॉपी आहे, ही गोष्ट खरी असली तर नक्कल करण्यासाठीही अक्कल लागते. मग तो ‘लाल सिंग चड्ढा' असो वा ‘सितारे जमीन पर'.
चित्रपट कुठे फसलाय ? (What are the pros and cons of Sitaare Zameen Par?)
हे कबूल करायला हवे की चित्रपटात काही उणीवा आहेत मात्र त्या चित्रपट ज्या हेतूने तयार करण्यात आला आहे त्यापुढे फिक्या पडतात. तरीही काही उणीवांबद्दल इथे सांगणे गरजेचे आहे. पहिली उणीव म्हणजे, चित्रपटाच्या पूर्वार्धामध्ये 10 बालकलाकारांचा परिचय करून देण्यात आलेला आहे, तो भाग काहीसा लांबल्यासारखा वाटतो. चित्रपटात आमीर खान त्याच्या वडिलांवर रागावलेला असतो. ते कारण हे थोडं जुनाट वाटतं. डॉली अहलुवालिया आणि बृजेन्द्र काला यांची चित्रपटातील ट्रॅक थोडा वेगळा झाल्याारखा वाटतो मात्र या दोघांनी फार सुंदर अभिनय केलाय.
सितारे जमीन पर चित्रपट कसा आहे ? (How is Aamir Khan in Sitaare Zameen Par?)
हा चित्रपट बनविण्याचा आमीर खानने निर्णय घेणं हीच चित्रपट आवडण्यामागची पहिली गोष्ट आहे. या चित्रपटात एक सामाजिक दृष्टीकोण असून या विषयाला इतर कोणी हात घालणं जवळपास अशक्य आहे. चित्रपटाच्या कथेचे श्रेय तुम्ही ‘चॅम्पियन्स'ला देऊ शकता, पण या हॉलीवूडपटाची स्क्रिप्ट हिंदी चित्रपटाच्या अनुषंगाने फिरवून घेणे, त्याला विनोदाची किनार देणे आणि त्याचवेळी समाजापर्यंत योग्य संदेश पोहचवण्याचे काम करणे हे कठीण काम होते, मात्र या चित्रपटाच्या टीमने ते चोखपणे पार पाडले आहे. हा चित्रपट कधी खळखळून हसवतो तर कधी हमसून हमसून रडायलाही भाग पाडतो. या चित्रपटासाठी डाऊन सिंड्रोम असलेल्या मुलांऐवजी सर्वसामान्य मुलांना घेता आले असते मात्र त्यांचे या चित्रपटात असणे हेच या चित्रपटाचे वेगळेपण आहे. या मुलांनी अत्यंत सुंदर अभिनय केला आहे. हा चित्रपट फक्त डाऊन सिंड्रोम असलेल्या मुलांबद्दल वेगळा दृष्टीकोण देण्यासाठी नसून चित्रपटाद्वारे खिलाडूवृत्ती, भीतीशी मुकाबला करण्याचे कौशल्य आत्मसात करणे, ज्येष्ठ नागरिकांच्या वाट्याला येणारे एकटेपण अशा अनेक सामाजिक विषयांवर भाष्य करण्यात आले आहे. शंकर-एहसान-लॉय यांनी दिलेल्या संगीतामुळे चित्रपटातील गाणी छान झाली आहे. या चित्रपटात ‘कयामत से कयामत तक'मधील सुपरहिट गीत “पापा कहते हैं” चे स्पिन-ऑफ व्हर्जन देखील आहे, जे फार उत्तम प्रकारे लिहण्यात आले असून त्याला छान चालही लावण्यात आली आहे.
हा चित्रपट प्रत्येकाने पाहायला हवा आणि तोही संपूर्ण कुटुंबासोबत. माझ्याकडून या चित्रपटाला मिळतात:
स्टार – 4
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world