Smriti Mandhana Palaash Muchhal Wedding News: भारतीय क्रिकेटर स्मृती मानधना आणि बॉलिवूडचा संगीतकार पलाश मुच्छल यांचा लग्नसोहळा पुढे ढकलण्यात आल्याने चाहत्यांना धक्का बसलाय. रविवारी 23 नोव्हेंबर रोजी त्यांचं लग्न होणार होतं. पण स्मृतीच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. यानंतर स्मृतीने लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय घेतल्याची माहिती तिच्या लग्नसोहळ्याचे व्यवस्थापन पाहणाऱ्या मॅनेजरने दिली.
स्मृती मानधनाने फोटो-व्हिडीओ डिलिट केले
लग्न पुढे ढकल्यानंतर स्मृतीने असंही काही केल ते पाहून सोशल मीडियावर वेगवेगळ्या चर्चांना उधाण येऊ लागलं. टीम इंडियाच्या स्टार बॅटरने सोशल मीडियावरुन साखरपुडा, लग्नाशी संबंधित पोस्ट डिलिट केले. स्मृतीच्या या निर्णयामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला. लग्न पुढे ढकलणे आणि अशा पद्धतीने फोटो-व्हिडीओ डिलिट करणं यामागील नेमकं कारण काय, हे जाणून घेण्याचा चाहते प्रयत्न करत आहेत.
पलाशची बहीण पलकने सोडलं मौन
दुसरीकडे पलाशची बहीण आणि प्रसिद्ध गायिका पलक मुच्छलने या सर्व प्रकरणावर मौन सोडलंय आणि लग्न पुढे ढकलण्यामागील खरं कारण सांगितलं.
पलक मुच्छलनं सोमवारी (24 नोव्हेंबर) रात्री भाऊ पलाश मुच्छल आणि क्रिकेटर स्मृती मानधना यांचा लग्नसोहळा पुढे का ढकलण्यात आला, यासंदर्भात एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली. "स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृतीमुळे स्मृती आणि पलाशचा लग्नसोहळा पुढे ढकलण्यात आलाय. या संवेदनशील काळामध्ये दोन्ही कुटुंबीयांच्या खासगी गोष्टींचा आदर करावा, अशी तुम्हा सर्वांना विनंती करते", अशा आशयाची पोस्ट पलकने शेअर केलीय. दरम्यान स्मृती आणि पलाश मुच्छलचं नेमके कधी लग्न होणार, याबाबत अधिकृतरित्या कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
Photo Credit: Palak Muchhal Instagram
पलाशने डीवाय पाटील स्टेडिअममध्ये स्मृतीला प्रपोज केलं होतं, या खास क्षणाचा व्हिडीओ त्याने सोशल मीडियावरही शेअर केलाय. यानंतर स्मृती आणि पलाशच्या ग्रँड लग्नसोहळ्याची झलक पाहण्यासाठी चाहते आतुर झाले होते. पण खासगी कारणांमुळे लग्न पुढे ढकलण्यात आलंय.