जाहिरात

Emotional Video: गुलाब, डायमंड रिंग...वर्ल्डकप जिंकला त्याच DY Patil स्टेडिअममध्ये पलाशने स्मृतीला केलं प्रपोज

Palash Muchhal Proposed Smriti Mandhana: बॉलिवूडमधील संगीतकार पलाश मुच्छलने सोशल मीडियावर खास व्हिडीओ शेअर केलाय, डीवाय पाटील स्टेडिअममध्ये गुडघ्यावर बसून स्मृती मानधनाला प्रपोज केले.

Emotional Video: गुलाब, डायमंड रिंग...वर्ल्डकप जिंकला त्याच DY Patil स्टेडिअममध्ये पलाशने स्मृतीला केलं प्रपोज
"Palash Muchhal Proposed Smriti Mandhana: पलाश मुच्छल आणि स्मृती मानधनाचा रोमँटिक व्हिडीओ"
Palash Muchhal Instagram

Smriti Mandhana Proposal Video: भारतीय क्रिकेटर स्मृती मानधना आणि बॉलिवूड संगीतकार पलाश मुच्छाल लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. लग्न सोहळ्यापूर्वी पलाश मुच्छलने सोशल मीडियावर खास व्हिडीओ शेअर केलाय. पलाशने स्मृतीला कशा पद्धतीने प्रपोज केले, याचा भावनिक आणि रोमँटिक व्हिडीओ व्हायर होतोय.

लाल गुलाब, डायमंड रिंग आणि क्रिकेटचं मैदान

पलाशने स्मृतीचे डोळे बंद करून तिला क्रिकेटच्या मैदानात आणले. यानंतर तिला लाल गुलाबांचा भलामोठा गुच्छ दिला आणि गुडघ्यावर बसून प्रपोज केलं. ज्या ठिकाणी वर्ल्ड कप जिंकला होता, त्याच डीवाय पाटील स्टेडिअममध्ये पलाशने स्मृतीला प्रपोज केले. या दोघांच्या इमोशनल व्हिडीओवर चाहत्यांकडून प्रेमाचा वर्षाव केलाय. रिपोर्ट्सनुसार, स्मृती मानधना आणि पलाश यांचा 23 नोव्हेंबर रोजी लग्नसोहळा पार पडणार आहे.  

सेलिब्रिटींसह चाहत्यांनीही केला शुभेच्छा वर्षाव

व्हिडीओमध्ये स्मृतीने पलाशला आणि पलाशने स्मृतीला अंगठी घातल्याचे दिसतंय. व्हिडीओ शेअर करून पलाश मुच्छलने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, तिने हो म्हटलं, यासह त्याने हार्ट इमोजी आणि रिंगचे इमोटिकॉनही शेअर केलंय. कमेंट बॉक्समध्ये चाहत्यांसह सेलिब्रिटी देखील हार्ट इमोजी शेअर करत दोघांचं अभिनंदन करत आहेत. 

(नक्की वाचा: Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या होणाऱ्या नवऱ्याला या गाण्यामुळे मिळाली प्रसिद्धी, इतक्या कोटी संपत्तीचा आहे मालक)

Smriti Mandhana Dance Video Viral: 'मुन्ना भाई MBBS' अंदाजात स्मृती मानधनाने लग्नाची केली घोषणा, समझो हो ही गया…

(नक्की वाचा: Smriti Mandhana Dance Video Viral: 'मुन्ना भाई MBBS' अंदाजात स्मृती मानधनाने लग्नाची केली घोषणा, समझो हो ही गया…)

पलाश आणि स्मृती रिलेशनशिपमध्ये कधीपासून आहेत?

स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल 2019 पासून रिलेशनशिपमध्ये आहेत. कित्येक कार्यक्रमांमध्ये दोघांना एकत्र पाहिलं गेलंय. काही वेळानंतर दोघांनीही इन्स्टाग्रामवर त्यांच्या रिलेशनशिपबाबतची अधिकृतरित्या घोषणा केली होती. यानंतर दोघांनी त्यांचे वाढदिवस साजरे करून खास फोटो देखील सोशल मीडियावर शेअर केले होते.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com