Smriti Mandhana Palash Muchhal Wedding Postponement: भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार खेळाडू स्मृति मानधना आणि प्रसिद्ध संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्नाची तारीख अचानक पुढे ढकलण्यात आली आहे. यामुळे सोशल मीडिया आणि क्रिकेट चाहत्यांमध्ये सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. अधिकृतपणे याला स्मृतीच्या वडिलांची तब्येत हे कारण देण्यात आले असले तरी, पलाशच्या कथित चॅट्सचा स्क्रीनशॉट व्हायरल झाल्यामुळे या प्रकरणाने वेगळे वळण घेतले आहे. या सर्व आरोप आणि शक्यतांदरम्यान आरजे महवशने इन्स्टाग्रामवर पोस्ट केलेल्या एका व्हिडिओने या चर्चेला अधिक हवा दिली आहे.
आरजे महवशचा मजेदार व्हिडिओ
आपल्या विनोदी व्हिडिओसाठी प्रसिद्ध असलेल्या आरजे महवशने स्मृती-पलाशचं लग्न टळल्याच्या बातम्यांदरम्यान एक व्हिडिओ शेअर केला. अनेक युझर्सनी तिच्या या व्हिडिओला थेट स्मृती-पलाश मुच्छल प्रकरणाशी जोडून पाहिले, ज्यामुळे सोशल मीडियावर नव्या चर्चांना उधाण आलं आहे.
महवशने आपल्या व्हिडिओमध्ये उपरोधिक शैलीत म्हटले, "पुरुष कधीही विचारलं तरीही सिंगलच असतात. हे बघा, मला माहीत नाही कोण खरं आहे कोण खोटं? पण माझ्या लग्नाच्या वेळी मी माझ्या नवरदेवाचे सगळे चॅट्स एक आठवडा आधीच इंटरनेटवर लॉन्च करेन. तुम्हीही चॅट्सचे स्क्रीनशॉट पब्लिक करा, नाहीतर मला पाठवा, मी करेन. कदाचित मी पब्लिक नाही करणार माझा विश्वास असेल असं तुम्हाला वाटेल. पण मी कुणावरच विश्वास ठेवत नाही. कारण कोणी काहीही करू शकतं. लग्नाआधी मला सांगा, मला वाचवा मित्रांनो."
(नक्की वाचा- Pune News : अगं बेबी, बाळा, पिल्लू, टिल्लू..., मराठीतील जाहिरातीवर पुणेकर संतापले, सोशल मीडियावर घमासान चर्चा)
लग्न का टळले?
स्मृति मानधना आणि पलाश मुच्छल यांचा विवाह 23 नोव्हेंबर रोजी होणार होता. मीडिया रिपोर्ट्सनुसार, स्मृतीच्या वडिलांची अचानक तब्येत बिघडल्याने हा विवाह सोहळा पुढे ढकलण्यात आला. वडिलांना रुग्णालयातून नुकतीच डिस्चार्ज मिळाला आहे. याच दरम्यान, पलाशलाही व्हायरल इन्फेक्शनमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
दुसरीकडे, पलाश मुच्छल आणि कोरियोग्राफर मॅरी डी'कोस्टा यांच्यातील कथित चॅटचे स्क्रीनशॉट सोशल मीडियावर व्हायरल झाले. या चॅट्समध्ये गैरवर्तन असल्याचा दावा केला जात आहे. पलाश किंवा त्यांच्या कुटुंबाने या व्हायरल चॅटवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र, लग्नाच्या ऐनवेळी ही घटना आणि चॅट व्हायरल झाल्यामुळे अनेक लोक लग्नाची तारीख टळणे आणि या चॅटचा संबंध जोडत आहेत. याबद्दल कोणतीही अधिकृत पुष्टी झालेली नाही.