जाहिरात

Pune News : अगं बेबी, बाळा, पिल्लू, टिल्लू..., मराठीतील जाहिरातीवर पुणेकर संतापले, सोशल मीडियावर घमासान चर्चा

मराठीतील जाहिरातींमधील भाषेचा वापर हा सध्या चर्चेचा ठरला आहे.

Pune News : अगं बेबी, बाळा, पिल्लू, टिल्लू..., मराठीतील जाहिरातीवर पुणेकर संतापले, सोशल मीडियावर घमासान चर्चा

Marathi advertisement : गेल्या वर्षी मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाला. महाराष्ट्रभरातून त्याचा आनंदही साजरा करण्यात आला. सध्या मराठी भाषेतील जाहिराती या वादाचा विषय ठरत आहे. अनेकदा हिंदी किंवा इतर कोणत्याही भाषेतील माहिती  मराठीत आणण्यासाठी भाषांतर केलं जातं. दुर्देवाने त्याच्या मतीतार्थाकडे फारसं लक्ष दिलं जात नाही असा आरोप केला जातो. 

मराठी जाहिरातीवर नागरिक संतापले 

मराठीतील जाहिरातींमधील भाषेचा वापर हा सध्या चर्चेचा ठरला आहे. पुण्यात एका जाहिरातीचं फलक लावण्यात आलंय. ही जाहिरात एका दागिण्यांच्या कंपनीचे आहे. येथे एका दाम्पत्य दिसलंय. पुरुष आपल्या शेजारी उभ्या असलेल्या महिलेला म्हणतो, बाळा काय चमकतीये तू! यातील 'बाळा' या शब्दावरुन पुणेकरांनी आक्षेप नोंदवला आहे. हिंदीमधील 'बेबी' या शब्दाचं भाषांतर 'बाळा' करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. परिणामी प्रेयसीला अशा प्रसंगी किंवा तिचं कौतुक करीत असताना बाळा शब्द उच्चारणं योग्य नसल्याचं पुणेकरांचं म्हणणं आहे. यासाठी तुम्ही पिल्लू किंवा इतर शब्द का वापरला नाही, असा सवाल उपस्थित केला आहे.   

ते जोडपं व्हायरल रीलमधलं...

बाळा हा शब्द इंग्रजीतील बेबी या शब्दासाठी वापरल्याचं अनेकांना वाटत असताना काहींनी त्या फोटोतील जोडप्याच्या रील्सची आठवण करून दिली. हे दोघेही प्रत्यक्षात रीलस्टार आहेत. Smrutiandonkar नावाने ते अकाऊंट चालवतात. यामध्ये ओनकार हा स्मृतीला बाळा नावाने हाक मारतो. त्यामुळे जाहिरातीच्या पोस्टमध्ये बाळा हा शब्द वापरल्याचं सांगितलं जात आहे.

Latest and Breaking News on NDTV

या पोस्टवर विविध प्रकारची मतमतांतरे पाहायला मिळत आहे. काहींनी बाळा या शब्दावर आक्षेप घेतलाय, तर काहींनी त्याचं समर्थन केलंय. तर अनेकांनी यामागील वेगळाच मुद्दा चर्चेत आणला आहे. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com