ऋतिक गणकवार, प्रतिनिधी
Palash Muchhal Defamation Case भारतीय महिला क्रिकेट संघाची स्टार बॅटर स्मृती मंधाना आणि प्रसिद्ध संगीतकार पलाश मुच्छल यांच्या लग्नाची चर्चा अख्ख्या देशात होती, पण ऐन लग्नाच्या काही तास आधी हे लग्न मोडलं आणि खळबळ उडाली. आता याच प्रकरणात एक धक्कादायक वळण समोर आलं आहे. पलाश मुच्छल हा दुसऱ्या एका मुलीसोबत बेडवर रंगेहात सापडला होता, असा खळबळजनक आरोप विज्ञान माने यांनी केला आहे. या गंभीर आरोपांनंतर पलाश मुच्छल यांनी कोर्टात धाव घेतली असून मुंबई उच्च न्यायालयाने आता या प्रकरणात हस्तक्षेप करत पलाश यांना मोठा दिलासा दिला आहे.
नेमका काय आहे हा बेडवरील तो प्रकार?
विज्ञान माने यांनी केलेल्या दाव्याने मनोरंजन आणि क्रिकेट विश्व हादरून गेलं होतं. माने यांच्या आरोपानुसार, पलाश मुच्छल याने स्मृती मंधानाची फसवणूक केली आहे. स्मृतीचा बालपणीचा मित्र असल्याचा दावा करणाऱ्या माने यांनी असा आरोप केला की, पलाश एका दुसऱ्या मुलीसोबत बेडवर रंगेहात सापडला होता. याच कारणावरून स्मृती आणि पलाश यांचं लग्न मोडल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. पलाशने हे सर्व आरोप साफ खोटे आणि धादांत चुकीचे असल्याचं म्हटलं असून, आपल्या प्रतिमेला तडा देण्याचा हा प्रयत्न असल्याचा दावा केला आहे.
आर्थिक फसवणूक आणि तुटलेलं लग्न
या वादाला केवळ वैयक्तिकच नाही तर आर्थिक किनारही आहे. विज्ञान माने यांनी पलाशवर 40 लाख रुपयांच्या फसवणुकीचाही आरोप केला आहे. सांगलीत 5 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या भेटीत 'नझरिया' नावाच्या फिल्म प्रोजेक्टमध्ये गुंतवणूक केल्यास मोठा परतावा मिळेल असं आमिष पलाशने दाखवलं होतं, असं माने यांचं म्हणणं आहे. त्यांनी पलाशला एकूण 40 लाख रुपये ट्रान्सफर केले, पण काम पुढे सरकलं नाही आणि पैसेही परत मिळाले नाहीत. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी सांगलीत या दोघांच्या लग्नाची तयारी पूर्ण झाली होती, पण लग्नाच्या काही तास आधीच सोहळा रद्द करण्यात आला, ज्यामागे पलाशचं अफेअर असल्याच्या चर्चांनी डोकं वर काढलं होतं.
( नक्की वाचा : Smriti Mandhana आणि Palash Muchhal चं लग्न का मोडलं? अभिनेत्यानं सांगितलं सांगलीमध्ये 'त्या' दिवशी काय घडलं? )
कोर्टात काय घडले?
पलाश मुच्छल यांनी या सर्व आरोपांविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आणि तब्बल 10 कोटी रुपयांचा मानहानीचा दावा दाखल केला. यावर सुनावणी करताना न्यायालयाने विज्ञान माने यांना कडक निर्देश दिले आहेत. कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय पलाश मुच्छल यांच्याबद्दल अशी बदनामीकारक विधानं करण्यास न्यायालयाने माने यांना मनाई केली आहे. विनापुरावा केलेले असे आरोप एखाद्या व्यक्तीचं करिअर आणि चारित्र्य उद्ध्वस्त करू शकतात, असं निरीक्षण न्यायालयाने नोंदवलं आहे.
पलाश मुच्छल यांनी इन्स्टाग्रामवरून स्पष्ट केलं आहे की, तो या खोट्या आरोपांविरुद्ध कायदेशीर लढा देणार आहेत. त्याने माने यांना कायदेशीर नोटीस पाठवून हे आरोप मागे घेण्यास सांगितलं होतं, मात्र माने आपल्या दाव्यावर ठाम राहिल्याने आता हे प्रकरण कोर्टात रंगात आलं आहे.
( नक्की वाचा : Love Story: 'ती' परत आली, पण नव्या ट्विस्टसह! जावयासोबत पळालेली सासू आता मेहुण्यासोबत गायब; नेमकं काय घडलं? )
कोर्टाने विज्ञान माने यांना त्यांचे आरोप सिद्ध करण्यासाठी किंवा उत्तर देण्यासाठी 2 आठवड्यांचा वेळ दिला आहे. तोपर्यंत त्यांना पलाशविरुद्ध कोणतंही भाष्य करता येणार नाही. आता पुढील सुनावणीत काय सत्य बाहेर येतं, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.