जाहिरात

Smriti Mandhana आणि Palash Muchhal चं लग्न का मोडलं? अभिनेत्यानं सांगितलं सांगलीमध्ये 'त्या' दिवशी काय घडलं?

Why Smriti Mandhana and Palash Muchhal Called Off Their Wedding?: टीम इंडियाची स्टार बॅटर स्मृती मंधाना आणि प्रसिद्ध संगीतकार पलाश मुच्छल यांच्या रद्द झालेल्या लग्नाची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून रंगत आहे.

Smriti Mandhana आणि Palash Muchhal चं लग्न का मोडलं? अभिनेत्यानं सांगितलं सांगलीमध्ये 'त्या' दिवशी काय घडलं?
Smriti Mandhana आणि Palash Muchhal हे लग्न करणार होते.
मुंबई:

Why Smriti Mandhana and Palash Muchhal Called Off Their Wedding?: टीम इंडियाची स्टार बॅटर स्मृती मंधाना आणि प्रसिद्ध संगीतकार पलाश मुच्छल यांच्या रद्द झालेल्या लग्नाची चर्चा गेल्या अनेक महिन्यांपासून रंगत आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये या दोघांचं लग्न होणार होतं, पण ऐनवेळी हे लग्न रद्द झालं. या घटनेनंतर सोशल मीडियावर विविध चर्चांना उधाण आलं होतं आणि पलाशवर अनेक आरोपही झाले होते. मात्र, आता या लग्नासाठी सांगलीला गेलेला अभिनेता नंदीश संधू याने त्या दिवशी नक्की काय घडलं होतं, याबाबत मोठा खुलासा केला आहे.

लग्नाच्या आदल्या दिवशी काय घडलं?

नंदीश संधूने एका मुलाखतीत सांगितलं की, तो स्वतः लग्नासाठी उपस्थित राहण्यासाठी सांगलीला गेला होता. मात्र तिथे पोहोचल्यानंतर त्याला समजलं की लग्न आता होणार नाही. 

नंदीशच्या म्हणण्यानुसार, स्मृतीच्या वडिलांची तब्येत अचानक बिघडल्यामुळे ते रुग्णालयात दाखल होते. याच कारणामुळे सर्व कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. अधिकृत पत्रकातही हेच कारण देण्यात आलं होतं, पण बाहेर मात्र वेगळ्याच चर्चा सुरू होत्या.

( नक्की वाचा : K-Pop Industry: दिवसाला 18 तास काम आणि जेवणावर निर्बंध, के-पॉप इंडस्ट्रीचा हा काळा चेहरा तुम्हाला माहित आहे? )

पलाश मुच्छलवर झालेल्या आरोपांवर प्रतिक्रिया

लग्न रद्द झाल्यानंतर पलाशने स्मृतीला फसवल्याच्या चर्चा माध्यमांमध्ये रंगल्या होत्या. यावर बोलताना नंदीश म्हणाला की, पलाशची बाजू कोणीही समजून घेण्याचा प्रयत्न केला नाही आणि हे पाहून त्याला खूप वाईट वाटलं. नंदीशने सांगितलं की त्याने पलाश आणि स्मृतीला गेल्या 5 ते 6 वर्षांपासून जवळून पाहिलं आहे. हे दोघं एकमेकांवर खूप प्रेम करायचे आणि एक उत्तम जोडी म्हणून ओळखले जात होते.

( नक्की वाचा :Ghooskhor Pandat: नेटफ्लिक्सला महाग पडणार घूसखोर पंडत? सोशल मीडियावर संतापाची लाट, नक्की काय आहे प्रकरण? )

नंदीशने व्यक्त केलं दुःख

मुलाखती दरम्यान नंदीशने असंही सांगितलं की, पलाशने या विषयावर स्वतःची बाजू मांडावी असं त्याला वाटतं. लग्नाच्या ठिकाणी नेमकं काय वातावरण होतं आणि परिस्थिती कशी बदलली, हे त्याने जवळून अनुभवलं होतं. पलाशवर ज्या पद्धतीने आरोप झाले, ते चुकीचे असल्याचं संकेत नंदीशने दिले आहेत.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com