जाहिरात

Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या होणाऱ्या नवऱ्याला या गाण्याने दिली प्रसिद्धी, इतक्या कोटी संपत्तीचा मालक

Smriti Mandhana Weds Palash Muchhal: स्मृती मानधनाने लग्नसोहळ्याची घोषणा अतिशय खास पद्धतीने केलीय, पाहिला का व्हिडीओ?

Smriti Mandhana: स्मृती मानधनाच्या होणाऱ्या नवऱ्याला या गाण्याने दिली प्रसिद्धी, इतक्या कोटी संपत्तीचा मालक
"Smriti Mandhana Weds Palash Muchhal : स्मृती मानधनाच्या होणाऱ्या नवऱ्याची एकूण संपत्ती किती आहे?"
Smriti Mandhana Insta

Smriti Mandhana Weds Palash Muchhal: भारतीय महिला क्रिकेट टीमची उप-कर्णधार स्मृती मानधना लवकरच तिचा प्रियकर आणि संगीतकार पलाश मुच्छलसोबत विवाह बंधनात अडकणार आहे. सोशल मीडियावर व्हिडीओ शेअर करुन लग्नसोहळ्याशी संबंधित कार्यक्रमांची तिने घोषणा देखील केलीय. मुन्नाभाई MBBS सिनेमातील 'समझो हो ही गया...' या गाण्यावर रील शूट करून तिने साखरपुड्याची अंगठी चाहत्यांना दाखवली. टीममेट जेमिमा रॉड्रिग्ज, राधा यादव, श्रेयांका पाटील आणि अरुंधती रेड्डीसह मिळून स्मृतीने व्हिडीओ तयार केलाय. दुसरीकडे स्मृती मानधनाचा होणारा पती पलाश मुच्छल नेमके काय करतो, त्याचा व्यवसाय काय आहे? यासह अन्य प्रश्नांची उत्तर जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. काही वर्षांपूर्वी त्यानं संगीतबद्ध केलेलं गाण तुफान गाजलं, या गाण्यामुळे त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली.

पलाशला त्याच्या पहिल्याच सिनेमामुळे मिळाली प्रसिद्धी

पलाशचा पहिला सिनेमा "ढिश्कियां" वर्ष 2014मध्ये रिलीज झाला होता, यानंतर त्यानं "भूतनाथ रिटर्न्स" सिनेमामध्येही संगीत दिलं होतं. या दोन्ही सिनेमांमधील त्याची गाणी गाजली होती. "भूतनाथ रिटर्न्स" मधील "पार्टी तो बनाती है" आणि "ढिश्कियां" मधील "तू ही है आशिकी" या गाण्यांमुळे पलाशची बॉलिवूडमध्ये ओळख निर्माण झाली.

पलाशनं अभिनेता म्हणूनही काम केलंय 

अभिषेक बच्चनचा मुख्य भूमिका असणारा सिनेमा 'खेलें हम जी जान से' सिनेमामध्येही अभिनेता म्हणून काम केलंय. या सिनेमामध्ये त्यानं झुनकू हे पात्र साकारलं होतं. 'खेलें हम जी जान से' सिनेमाचं दिग्दर्शन आशुतोष गोवारिकर यांनी केलं होतं. या एकमेव सिनेमामध्ये पलाशने अभिनेता म्हणून काम केलंय. संगीतकार म्हणून पलाशला यश मिळालं तेव्हा त्याने याच व्यवसायामध्ये पूर्णपणे लक्ष केंद्रित केलं.

Smriti Mandhana Dance Video Viral: 'मुन्ना भाई MBBS' अंदाजात स्मृती मानधनाने लग्नाची केली घोषणा, समझो हो ही गया…

(नक्की वाचा: Smriti Mandhana Dance Video Viral: 'मुन्ना भाई MBBS' अंदाजात स्मृती मानधनाने लग्नाची केली घोषणा, समझो हो ही गया…)

पलाश किती कोटी रुपयांच्या संपत्तीचा मालक आहे?

विविध सूत्रांनुसार 30 वर्षीय पलाश मुच्छलची एकूण संपत्ती जवळपास 25 कोटी रुपये इतकी आहे. सिनेमांव्यतिरिक्त पलाश कार्यक्रमांच्या माध्यमातूनही कमाई करतो. पलाशने मागील एका कार्यक्रमादरम्यान स्मृती मानधना लवकरच इंदुरची सून होणार असल्याचे सांगितलं होतं. रिपोर्ट्सनुसार 23 नोव्हेंबर रोजी स्मृती आणि पलाश लग्न करणार आहेत.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com