Pooja Birari Marriage: अभिनेते आदेश बांदकेर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांचा मुलगा सोहम बांदेकरचा लग्नसोहळा धुमधडाक्यात पार पडला. गेल्या काही दिवसांपासून सोहमच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरू होती. स्टार प्रवाह वाहिनीवरील 'येड लागलं प्रेमाचं' मालिका फेम अभिनेत्री पूजा बिरारीसोबत त्यानं लग्नगाठ बांधलीय. पारंपरिक पद्धतीने दोघांचा विवाहसोहळा पार पडला. लग्नसोहळ्यामध्ये दोन्ही कुटुंबातील सदस्य, नातेवाईक, मित्रपरिवार उपस्थित होते.
पूजा बिरारीचा सुंदर लुक | Pooja Birari Wedding
विवाहसोहळ्यासाठी पूजाने गुलाबी रंगाची साडी नेसली होती आणि सोहमनं पूजाच्या पेहरावाशी कॉन्ट्रास्ट रंगाचा पोशाख परिधान केला होता. पूजाचा लुकही प्रचंड सुंदर होता. लोणावळ्यातील एका रेसॉर्टमध्ये लग्नाचं आयोजन करण्यात आलं होतं.
अभिनेता सचित पाटीलने इन्स्टाग्रामवर सोहम-पूजाचे काही फोटो-व्हिडीओ देखील शेअर केले आहे. दोघांनी सुंदर उखाणाही घेतला.
सोहमनं भरवला पहिला घास छान होती भाजी मियाँ बीवी राज़ी क्या करेगा क़ाज़ी, असा उखाणा पूजाने घेतला.
तर "शंकराच्या पिंडीवर बेल वाहतो वाकून पूजाचं नाव घेते सर्वांचा मान राखून. बायकोचं नाव आहे पूजा,पूजा तेरेसिवा ना मेरा कोई दुजा" , असे दोन उखाणे सोहमने पूजासाठी घेतले.
लग्नसोहळ्यापूर्वी पूजा बिरारीने गंमतीशीर व्हिडीओ शेअर केला होता