Soham Bandekar Wife Video: मराठी कलाविश्वातील अनेक लोकप्रिय कलाकारांचे लग्नसोहळ्याचे फोटो सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. काहींचे लग्न झालंय तर काही कलाकार मंडळी लवकरच लग्नबेडीत अडकणार आहेत. काही महिन्यांपासून महाराष्ट्राचे भावोजी आदेश बांदेकर आणि अभिनेत्री सुचित्रा बांदेकर यांच्या लाडक्या लेकाच्या लग्नाचीही जोरदार चर्चा सुरू आहे. काही दिवसांपूर्वी सोहम बांदेकरचं केळवणही पार पडलं. पण बांदेकरची होणारी सून कोण आहे? हा प्रश्न अनुत्तरितच होता. अखेर सुचित्रा आणि आदेश बांदेकरांच्या होणाऱ्या सूनेबाबतचा सस्पेन्स संपलाय. स्वतः सूनेनंच जाहीर कबुली दिलीय.
आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर यांची होणारी सून कोण आहे?
स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय मालिका 'येड लागलं प्रेमाचं' फेम अभिनेत्री पूजा बिरारीसोबत सोहम बांदेकर लग्न करणार असल्याची माहिती समोर आली होती आणि ही चर्चा खरी ठरलीय. सोहम बांदेकरशी लग्न होणार असल्याचे स्वतः पूजा बिरारीने सांगितलंय. 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेच्या सेटवर सहकलाकारांनी पूजा बिरारीसाठी केळवण सोहळ्याचे आयोजन केले होते.
पूजा बिरारीच्या केळवण सोहळ्याचा एक्सक्लुझिव्ह व्हिडीओ | Pooja Birari Kelvan Exclusive Video
अभिनेता अक्षय टाक म्हणजे 'येड लागलं प्रेमाचं' मालिकेतील डिफिक्लटने पूजा बिरारीच्या केळवण सोहळ्याचा व्हिडीओ यू-ट्युबवर शेअर केलाय. 13.31 मिनिटांच्या या व्हिडीओमध्ये मालिकेच्या सेटवर पूजाचा केळवण सोहळा कसा पार पडला, याची धमाल पाहायला मिळतेय. सहकलाकारांनी पूजासाठी खास पदार्थांची मेजवानी आयोजित करत तिला सुंदर साडी देखील भेट म्हणून दिली. मालिकेतील जवळपास सर्वच कलाकार केळवणासाठी उपस्थित होते. यावेळेस पूजाने सोहमसाठी उखाणा देखील घेतला.
(नक्की वाचा: Dharmendra: राहिल्या फक्त आठवणी...धर्मेंद्र यांच्या निधनानंतर हेमा मालिनींची पहिली प्रतिक्रिया, शेअर केले अतिशय खास फोटो)
सोहम बांदेकरसाठी पूजा बिरारीचा उखाणा"घरात चालले मी ज्यांच्या ते आहेत महाराष्ट्राचे होम मिनिस्टर, माझे अहो म्हणजेच सोहम आता होणार माझे मिस्टर", असा उखाणा पूजाने घेतला. पूजाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होता, याच व्हिडीओमुळे पूजा आणि सोहमचे लग्न होणार असल्याच्या बातमीवर अधिकृतरित्या शिक्कामोर्तब झालंय. पण लग्न कधी होणार आहे, याबाबत सस्पेन्स कायम आहे.
'येड लागलं प्रेमाचं' मालिकेत पूजा बिरारी मंजिरी हे पात्र साकारत आहे. विशेष म्हणजे मालिकेतही तिच्या लग्नाची धामधूम सुरू आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

